scorecardresearch

उसाच्या रसाचे ‘हे’ आहेत ५ आरोग्यवर्धक फायदे

ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. ‘हे’ आहेत ५ गुणकारी फायदे

उसाच्या रसाचे ‘हे’ आहेत ५ आरोग्यवर्धक फायदे
उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण मुबलक असतं. (Photo : Pixabay)

आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी असतो. मुळातच ऊस अत्यंत पौष्टिक असतो. चवीला अगदी गोड पण लो कॅलरी काँटेन्ट असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. असं म्हणतात कि, ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. सोबतच, आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतं. त्यात उसाच्या रसाला जेव्हा लिंबू आणि मिठाची जोड मिळते तेव्हा तो आणखी चवदार लागतो आणि आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतो. उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. ऊस आपलं शरीर थंड करण्यासह जठराला आराम देण्याचं देखील काम जातो. आज आपण याचबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. उसाच्या रसाच्या सेवनाचे आणखी कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात? पाहूया

१) मधुमेहींसाठी फायदेशीर

ऊस आपल्या शरीरातील ग्लुकोजच प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो. यात नॅचरल स्वीटनर्स असतात. त्यामुळे मधुमेहींनी उसाच्या रसाचं योग्य प्रमाणात सेवन करणं सुरक्षित मानलं जात आहे. परंतु, त्याचं जास्त प्रमाणात सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी.

२) यकृतासाठी गुणकारी

कावीळग्रस्त व्यक्तीला देखील उसाचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. यकृतासाठी हा रस अत्यंत फायदेशीर असतो. त्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं आणि त्याच्याशी संबंधित सर्व आजार दूर करतं.

३) प्रतिकारशक्तीत वाढ 

मजबूत रोगप्रतिकारक शक्ती ही काळाची गरज आहे. म्हणूनच, नियमितपणे एक ग्लास उसाचा रस घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि विविध व्हायरल इन्फेक्शन्सपासून आपलं संरक्षण होऊ शकतं.

४) वजन घटवण्यात मदत

उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात असलेलं फायबर आपल्या पोटाला जास्त काळ तृप्त ठेवतं आणि अतिरिक्त किलो कमी करण्यास अर्थात वजन घटवण्यास मदत करतं. इतकंच नव्हे तर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं.

५) तजेलदार त्वचा 

उसाचा रस चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यासाठी चमत्कारिकरित्या मदत करतो. त्यातील उच्च पातळीचं सुक्रोज जखमा भरण्यास मदत करतं. त्याचसह त्वचेवरील डाग आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकतं.

६) हाडांचा आरोग्य सुधारतं 

उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण मुबलक असतं. हे सर्व घटक आपल्या हाडांचं आरोग्य सुधारण्यास मोठी मदत करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-08-2021 at 13:53 IST

संबंधित बातम्या