scorecardresearch

Healthy Drinks: उन्हाळयात पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नाहीये? तर ‘या’ ५ ड्रिंक्सचे करा सेवन, शरीर राहील हायड्रेट

उन्हाळयात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याशिवाय अशी काही पेये देखील आवश्यक असतात, जी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात.

डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाण्यासोबत काही आरोग्यदायी पेये प्या जे तुमची तहान भागवेल. (photo credit: freepik)

उन्हाळा झपाट्याने वाढत असून मार्च महिन्यातच पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तसेक आता उन्हाळा वाढल्याने पाण्याची तहान वाढू लागली आहे. अशा हवामानात तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकीच तुम्हाला तहान लागते. अनेक वेळा जास्त पाणी प्यायल्याने पोट फुगायला लागते, पण तहान भागत नाही. अशा हवामानात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याशिवाय अशी काही पेये देखील आवश्यक असतात, जी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात.

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण कोल्ड्रिंक्स आणि बॉक्स पॅक ज्यूस यांसारखी अस्वास्थ्यकर पेये सेवन करतो ज्यामुळे आपला घसा खराब होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. उन्हाळ्यात जास्त तहान लागण्यामागे डिहायड्रेशन हे सर्वात मोठे कारण आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाण्यासोबत काही आरोग्यदायी पेये प्या जे तुमची तहान भागवेल. तसेच तुमचे शरीर हायड्रेट ठेवेल. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण कोणते हेल्दी ड्रिंक घेऊ शकतो ते जाणून घेऊया.

ताक पिणे

उन्हाळ्यात तहान लागत असेल तर ताकचे सेवन करा. ताक उष्णता दूर करेल, तसेच शरीराला हायड्रेट ठेवेल. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला जीवनसत्त्वे A, B, C, E आणि K सारखी पोषक तत्वे मिळतील, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्यात ताक शरीराला थंड करून शरीर सक्रिय ठेवते.

नारळ पाणी उष्णतेचा प्रभाव कमी करेल

नारळ पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. याचे सेवन केल्याने उन्हाळ्यात डिहायड्रेशन थांबते. उन्हाळ्यात नारळाच्या पाण्यामुळे घाम येताना शरीरातून बाहेर पडणारे नैसर्गिक क्षार भरून निघतात.

लिंबूपाणी तहान भागवेल

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्यानंतर पोट फुगायला लागले तर अशावेळी तुम्ही लिंबूपाणीचे सेवन करा. लिंबू पाणी तहान भागवते तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.

फळांचा रस प्या

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फळांच्या रसाचे सेवन करा. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पचनक्रियाही चांगली होते. कमी कॅलरीयुक्त पदार्थांमुळे तुमचे वजनही झपाट्याने कमी होते.

मिल्क शेकचे सेवन करा

उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी तुम्ही मिल्क शेकचेही सेवन करू शकता. मिल्कशेक बनवण्यासाठी तुम्ही त्यात रुहाफजा आणि वेलचीचे सेवन करू शकता. दुधात अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकूनही तुम्ही शेक बनवू शकता. हा शेक तुमच्या शरीराला ऊर्जा देईल, तहानही शमवेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 summer healthy drinks to control excess thirst scsm