स्मार्टफोन आपल्यापैकी बहुतेकांसाठी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल, आपण स्मार्टफोनवरून घरगुती वस्तू ऑर्डर करण्यापासून अलार्म आणि फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत सर्व काही करू शकतो. मात्र, कधी-कधी स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटनाही समोर येत असल्याचे आपण पाहतो. अखेर फोनमध्ये असे काय होते की स्मार्टफोनचा स्फोट होतो. तथापि, काही पद्धती आणि सावधगिरी आहे ज्याद्वारे आपण स्मार्टफोनला क्रॅक होण्यापासून रोखू शकतो. आम्ही तुम्हाला त्या महत्त्वाच्या टिप्सबद्दल सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुमचा स्मार्टफोन फुटणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. फोन चार्जिंगवर जास्त वेळ राहू नये याची काळजी घ्या. याचा अर्थ रात्री फोन चार्जिंगवर लावून झोपू नका, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात फोन बराच वेळ चार्ज केल्यानंतर ब्लास्ट झाल्याचे समोर आले आहे. जेव्हा तुम्ही तुमचा फोन चार्ज कराल तेव्हा काळजी घ्या आणि पूर्ण चार्ज झाल्यावर तो चार्जिंगमधून काढून टाका.

आणखी वाचा : राज ठाकरे यांच्या नातवाची पहिली झलक, फोटो व्हायरल

२. लक्षात ठेवा फोन चार्ज करताना त्यावर काम करू नका. चार्जिंग करताना चित्रपट पाहणे आणि गेम खेळणे घातक ठरू शकते आणि तुमच्या बॅटरीचे तापमान वाढू शकते. असो, चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान वाढते आणि तो गरम होतो.

३. फोन नेहमी सोबत आलेल्या मूळ कंपनीने दिलेल्या चार्जरने चार्ज करणे महत्त्वाचे आहे. फोन दुसर्‍या किंवा लोकल चार्जरने चार्ज करणे देखील धोकादायक असू शकते. शक्य असल्यास हे टाळा.

आणखी वाचा : फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि ते का होते? मधुमेहाच्या रुग्णांना ‘ही’ माहिती असणे आहे आवश्यक

४. काही वेळा उत्पादनातील दोषामुळे फोनचा स्फोट होतो. अनेकवेळा फोनमध्ये दिलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे फोनचा स्फोट होतो. सदोष घटक किंवा अयोग्य असेंब्लीमुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि स्फोट होऊ शकते. असे म्हटले जाते की स्वस्त बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

५. स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बॅटरीची स्थिती, कधीकधी फोन खाली पडतो आणि त्यामुळे बॅटरी खराब होते. यामुळे बॅटरीची रासायनिक किंवा अंतर्गत यांत्रिक रचना बदलते आणि यामुळे शॉर्ट सर्किट, जास्त गरम होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. खराब झाल्यानंतर बॅटरी अनेक वेळा फुगते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 useful tips to prevent smartphone explosion and blast dcp
First published on: 06-05-2022 at 17:06 IST