How to Prevent and Treat Shoe Bites : एखादी नवीन चप्पल, सँडल, स्लिपर किंवा बूट घेतल्यानंतर पहिल्यांदा घातल्यावर अनेकदा पायाला त्रास लागतो. नवीन फुटवेअरची सवय होईपर्यंत कधी बँडेज लावून तर कधी कापडाची पट्टी लावून, सॉक्स घालून घालावे लागते. मात्र, हा त्रास काही दिवस सतत सहन करणे अनेकांसाठी असह्य होते. सततच्या घर्षणामुळे अनेकदा जखमा, फोड किंवा किरकोळ दुखापती होऊ शकतात. जर दुखापत गंभीर नसेल आणि त्यात खोल जखम नसेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करून घरीच आराम मिळवू शकता. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर आम्ही काही खास उपाय घेऊन आलो आहोत…

जखम स्वच्छ करा

जर चपलांमुळे तुमच्या पायाला कधी जखम झाली. तर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर, आजूबाजूची त्वचा सौम्य साबणाने स्वच्छ करा. यामुळे धूळ, घाण आणि जीवाणू निघून जाण्यास मदत होते.

थंड शेक द्या

जर तुम्हाला जखमेमुळे जळजळ किंवा सूज येत असेल तर बर्फ एका स्वच्छ कापडात गुंडाळा आणि जखमेवर ५ ते १० मिनिटे धरून ठेवा. बर्फ थेट जखम झालेल्या भागावरच लावला जाईल याची खात्री करा.

कोरफड लावा

तुम्ही जखम झालेल्या ठिकाणी ताजा कोरफडीचा गर लावू शकता. त्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे स्वच्छ जखमेभोवती हळुवारपणे लावता येते. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते.

नारळाचे तेल

जर जखम खूप खोल नसेल आणि फक्त घर्षणाने त्वचा खरचटली असेल. तर तुम्ही थोडे नारळाचे तेल लावू शकता. यामुळे त्वचा मऊ राहण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

जखम झाकून ठेवा

जर जखम अशा ठिकाणी असेल जिथे बुटांमुळे वारंवार घासले जाण्याची शक्यता असेल. तर जखमेवर स्वच्छ पट्टी लावा. यामुळे जखमेचे संरक्षण होईल आणि ती लवकर बरी होण्यास मदत होईल आणि आठवणीने दररोज पट्टी बदला.

डॉक्टरांना कधी भेटणे आवश्यक आहे?

जर जखम खोल आणि त्याच्याभोवती जास्त लालसरपणा, सूज किंवा पू असेल. त्याचबरोबर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल. जर जखम २ ते ३ दिवसांत बरी होण्याऐवजी अधिकच बिघडत जाईल. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांकडे जाणे सोयीस्कर ठरणार आहे.