१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा केला जातो. कारण याच दिवशी भारतात ब्रिटीश राजवटीचा अंत झाला होता. ब्रिटीशांनी जवळजवळ आपल्या भारतावर २०० वर्ष राज्य केलं होतं. आपला भारत देश स्वातंत्र व्हावा याकरिता अनेक महान हुतात्म्यांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण द्यावे लागले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकांना सार्वजनिक सुट्टी असते. स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्या आसपासच्या शाळेत किंवा स्वातंत्र्यदिनाच्या समारंभस्थळी परेड पाहण्यासाठी बाहेर जात असतात. काहीजण आपल्या कुटुंबासोबत, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. परंतु गेल्या दोन वर्षापासून करोना साथीच्या रोगाने संपूर्ण देशभर तसेच जगात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपली काळजी घेण्यासाठी व करोनापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले. यामुळे अनेकांना बाहेर जाऊन हा दिवस साजरा करण्याची तसेच परेड पाहण्यासाची परवानगी देण्यात आली नाही.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
first general election of india 1952 information
देशातील पहिली निवडणूक कशी पार पडली होती? काय होती आव्हाने?
maharashtra lokrang article, maharashtra lokrang
प्रगल्भ महाराष्ट्राच्या आठवणी
uddhav thackeray slams bjp raises questions over contribution in india freedom
उद्धव ठाकरे म्हणतात,‘भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात योगदानच काय?, गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही निवडणूक रोखे…’

दरम्यान तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे घरच्याघरी ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करू शकता. चला तर मग पाहुयात कशा पद्धतीने हा दिवस साजरा करू शकता.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाबद्दल चित्रपट पहा.

सकाळी स्वातंत्र्य दिनाच्या परेडचे थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाविषयी काही चित्रपट आहेत ते पाहू शकता. तुम्ही यावेळी गांधी, मंगल पांडे, द लीजेंड ऑफ भगतसिंग इत्यादी देशभक्तीपर चित्रपट पाहू शकता.

देशभक्ति गीतांची अंताक्षरी खेळा

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तसेच कुटुंबासोबत देशभक्तीच्या गाण्यांवर अंताक्षरी खेळून तुम्ही हा दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करू शकता.

स्वातंत्र्याबद्दल अनेक पुस्तक वाचा

करोनाच्या या परिस्थितीमुळे तुम्ही कोणीच सध्या घराबाहेर जाऊन हा दिवस साजरा करू शकत नाही. यामुळे तुम्हाला व तुमच्या घरच्यांना वेळ मिळाला आहे. अशा वेळी तुम्ही या दिवशी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच जे देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढले अश्या महान व्यक्तिबद्दल अनेक पुस्तक उपलब्ध आहेत. या पुस्तकांचे वाचन करा. कारण लाखो लोकं या संघर्षाचा एक भाग होते आणि त्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. कथांपासून कवितेपर्यंत,कल्पनेपासून नॉन-फिक्शनपर्यंत, तुम्हाला पाहिजे असलेले सर्व काही उपलब्ध आहे.

छान जेवणाचा बेत करा.

तुम्ही छान स्वादिष्ट जेवण बनवून आपल्या कुटुंबासह आणि मित्रांबरोबर आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करू शकता.