नवविवाहित जोडप्यांना लग्नाचं गिफ्ट म्हणून ‘हे’ राज्य देणार कंडोम किट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

लग्नाच्या बंधनात बांधले जाणाऱ्या नव्या जोडप्यांना भेट म्हणून ‘कुटुंब नियोजन किट’ देण्यात येणार आहे. या किटमध्ये कंडोमसह कुटुंब नियोजनाशी निगडित अन्य गोष्टींचा समावेश असेल.

नवविवाहित जोडप्यांना लग्नाचं गिफ्ट म्हणून ‘हे’ राज्य देणार कंडोम किट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता लोकसंख्या नियंत्रणाकडे सरकारचा कल आहे. (Photo : Freepik)

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी ते वरदान होते, पण आता ते शाप बनले आहे. त्यामुळे बेरोजगारी, उपासमार, निरक्षरता या समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याला आता सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. भारत हा देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता लोकसंख्या नियंत्रणाकडे सरकारचा कल आहे.

याच पार्श्वभूमीवर एक बातमी समोर आली आहे. एका राज्याने एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून सध्या हा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत लग्नाच्या बंधनात बांधले जाणाऱ्या नव्या जोडप्यांना भेट म्हणून ‘कुटुंब नियोजन किट’ देण्यात येणार आहे. या किटमध्ये कंडोमसह कुटुंब नियोजनाशी निगडित अन्य गोष्टींचा समावेश असेल.

क्षुल्लक कारणावरून ‘या’ महिलेने ९० सेकंदांत रिक्षाचालकाला मारल्या १७ थप्पड; Viral Video पाहून तुम्हालाही येईल राग

राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत सुरू करण्यात येत असलेल्या नवीन उपक्रम योजनेचा उद्देश तरुण जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पद्धतींबद्दल शिक्षित करणे आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. ओडिशा राज्य सरकारने नवविवाहित जोडप्यांना भेट म्हणून वेडिंग किट देण्याची योजना आखली आहे.

या किटमध्ये कुटुंब नियोजनाच्या पद्धती आणि त्याचे फायदे, विवाह नोंदणी फॉर्म, कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या यांची माहिती देणारे पुस्तक असेल. याशिवाय भेट दिलेल्या किटमध्ये गर्भधारणा चाचणी किट, टॉवेल, कंगवा, नेल कटर, आरसा देखील असेल.

या योजनेची माहिती देताना कुटुंब नियोजन संचालक डॉ.बिजय पाणिग्रही म्हणाले की, मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेवक नवविवाहित जोडप्यांना किटचे वाटप करणार असून ते यावर्षी सप्टेंबरपासून या कामाला सुरुवात करणार आहेत. या कामासाठी आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जात आहे, जेणेकरुन ते लोकांना यासंबंधी योग्यरित्या जागरूक करू शकतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A condom kit will be given to newlyweds as a wedding gift odisha government know what is the whole case pvp

Next Story
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सफरचंद खाल्ल्यानेही वाढू शकतं वजन; जाणून घ्या या मागील नेमकं कारण
फोटो गॅलरी