Kitchen Jugaad Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणी डान्सचे व्हिडीओ शेअर करतात तर कधी कोणी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ शेअर करतात. कधी कोणी त्यांच्या कला सादर करतात तर कधी कोणी हटके जुगाड आणि ट्रिक सांगताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू टाकल्यानंतर कोणती कमाल होते, याविषयी सांगताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गव्हाचा पिठामध्ये शाम्पू टाकताच कमाल झाली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला एक मोठा चमचा गव्हाचे पीठ घेते. या पिठामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकते. त्यानंतर त्यामध्ये शाम्पू टाकते (तुम्ही वापरत असलेला कोणताही शाम्पू टाकू शकता) त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू चांगला एकत्रित करते आणि स्क्रबच्या मदतीने या मिश्रणाने घरातील भांडी घासताना दिसते.बेसिन स्वच्छ करताना दिसते महिला सांगते की शाम्पू गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करताना पेस्ट तयार करू नका. पावडर असू द्या. या पावडरच्या मदतीने सर्व काळपटपणा दूर होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तुम्ही आजवर असा जुगाड पाहिला नसेल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विचित्र वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : १० रुपयांत टाकीतला गाळ करा गायब, पाणी नेहमी राहील स्वच्छ; टाकीत उतरण्याची पण गरज नाही, सहज जुगाडाचा Video पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : रक्तातील लोह वाढवण्यासाठी ‘बीट, अननस अन् लिंबाचा रस ठरेल का फायदेशीर? काय सांगतात तज्ज्ञ?

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गव्हाचा पिठामध्ये शाम्पु टाकताच कमाल झाली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ जर कोणी पूर्ण बघितला नाही तर तो शाम्पूच्याा चपात्या खाईल” तर एका युजरने लिहिलेय, “पिठापेक्षा राख वापरायची की…… उगीच पिठाचे नुकसान” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय ओ ताई येवढ्या नवीन idea येतात कुठून” आणखी एका युजरने लिहिलेय, “शाम्पूनचे घासायचे मग पीठ कशाला?” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला नाही.