Aamir Khan Weight Loss: बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आहे. तो आता पूर्वीपेक्षा अधिक फिट दिसत आहेत, त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आमिर खानने सुमारे १८ किलो वजन कमी केलं आहे. चला तर जाणून घेऊया त्याने हे कसं केलं.

आमिरने सांगितलं की वजन कमी करणं हा कोणताही ठरवलेला प्लॅन नव्हता. आरोग्याच्या कारणांमुळे त्याने आपला आहार बदलला आणि त्याचा परिणाम आपोआप दिसू लागला. हा बदल त्याच्यासाठीही थोडासा आश्चर्यकारक होता.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आमिरने सांगितलं की त्याचं नवं डाएट त्याच्यासाठी जादूसारखं काम करत आहे. अभिनेत्याने म्हटलं की हे सगळं कोणताही जादा प्रयत्न न करता झालं आणि वजन आपोआप कमी होत गेलं.

आमिरने सांगितले की हा डाएट सुरू करण्यामागे सतत होणारा मायग्रेन हे कारण होतं. मायग्रेनपासून आराम मिळावा म्हणून त्याने अँटी-इन्फ्लेमेटरी डाएट स्वीकारलं. यामुळे केवळ वजनच कमी झालं नाही, तर डोकेदुखीची समस्या देखील खूप कमी झाली.

डायटीशियननुसार, अँटी-इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये असे पदार्थ असतात जे शरीरातील आतली सूज कमी करतात. या आहारात डार्क चॉकलेट, फॅटी फिश, चेरी, ब्रोकोली आणि ग्रीन टी यांसारख्या गोष्टी खाल्ल्या जातात. हे पदार्थ मेटाबॉलिझम सुधारतात आणि शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी साठू नये यासाठी मदत करतात.

याशिवाय मशरूम, द्राक्षे, अ‍ॅव्होकॅडो, टोमॅटो आणि बेरीजही या डाएटमध्ये समाविष्ट असतात. हे पदार्थ पचन सुधारतात, बराच वेळ भूक लागू देत नाहीत आणि शरीर हलके वाटायला मदत करतात. त्यामुळे क्रॅश डाएट किंवा जिमला न जाता देखील वजन हळूहळू कमी होऊ लागते.

या आहारातील बदलाचा दुहेरी फायदा झाला. आमिरच्या मते, एकीकडे त्याचे वजन कमी झाले, तर दुसरीकडे मायग्रेनची समस्या देखील खूप कमी झाली. म्हणजेच हे वजन कमी होणे पूर्णपणे आरोग्याशी संबंधित होते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)