केवळ डोळा फडफडल्याने मिळतात हे संकेत, तुम्हाला माहित नसतील, एकदा वाचाच!

शरीराचे अवयव फडफडणे, एखादी विशिष्ट गोष्ट दिसणं, स्वप्ने इ. हे संकेत आणि त्यांचे अर्थ ज्योतिष आणि शकुन शास्त्रात सांगितले आहेत. यामध्ये डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा देखील समाविष्ट आहे. पण, शरीराचे अवयव फडफडण्याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांसाठी भिन्न आहे.

Twitching-Of-Eyes-signs

चांगल्या-वाईट घटना घडण्याआधीच त्याचे संकेत मिळत असतात. हे संकेत आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात. उदाहरणार्थ, शरीराचे अवयव फडफडणे, एखादी विशिष्ट गोष्ट दिसणं, स्वप्ने इ. हे संकेत आणि त्यांचे अर्थ ज्योतिष आणि शकुन शास्त्रात सांगितले आहेत. यामध्ये डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा देखील समाविष्ट आहे. पण, शरीराचे अवयव फडफडण्याचा अर्थ पुरुष आणि स्त्रियांसाठी भिन्न आहे.

सर्वात फडफडणारा अवयव डोळा आहे

आपल्या अवयवांच्या फडफडण्याबाबत बोलताना स्त्री असो वा पुरुष, दोघांचेही डोळे अनेकदा फडफडत असतात. पण डोळे फडफडण्याचा अर्थ दोघांसाठी वेगवेगळा आहे. पुरुषांसाठी, उजव्या डोळ्याच्या वरची पापणी फडफडल्यास प्रमोशन मिळण्याचे संकेत असतात. तसंच, त्यातून पैसे मिळतात. त्याच वेळी, खालच्या पापणीचे फडफडणे हे अशुभ घटनेचं लक्षण मानलं जातं.

दुसरीकडे, स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या उजव्या बाजुचा डोळा फडफडू लागला की अशुभ घटनेचं संकेत मानलं जातं. स्त्रियांचा डावा डोळा फडफडणं ही शुभ कार्यक्रमाची पूर्ववर्ती आहे. जर एखादी महिला ऑफीसमध्ये जाणारी असेल तर डाव्या डोळ्याची फडफड तिच्या करिअरमधील प्रगतीचे मजबूत संकेत असू शकते. जर पुरुषांचा डावा डोळा फडफडला तर त्यांचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. यात त्यांचं नुकसान देखील होण्याचं संकेत असतात.

आणखी वाचा : ‘या’ चार राशींच्या मुलींमध्ये असते खास आकर्षण शक्ती; नेहमी प्रेमाचा वर्षाव होतो…

दोन्ही डोळे एकाच वेळी फडफडत असतील तर…

जर दोन्ही डोळे एकत्र फडफडू लागले तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जुन्या हरवलेल्या मित्राला भेटणार आहात. हे चिन्ह पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी समान आहे. त्याच वेळी, जर एखाद्या पुरुषाच्या डाव्या डोळ्याची वरची पापणी फडफडली तर त्यांच्या कुटुंबात मुलाच्या आगमनाचे संकेत आहे.

याशिवाय, उजवा डोळा मागच्या बाजुने फडफडणे हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही चांगले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aankh phadakne ka matlab twitching of the eye gives so many positive negative signs for woman and man prp

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या