Ac Outdoor Unit Placement Tips Hacks In India : उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढतेय, वाढत्या तापमानामुळे घरात बसणे आता अवघड होतेय, अशाने प्रत्येक घरात आता एअर कंडिशनर (एसी) एक गरज बनतोय. अनेक घरात एसी आहे, पण नीट कुलिंग होत नाही पण ही समस्या असूनही वीज बिल मात्र अपेक्षेपेक्षा जास्त येतेय. यामागे खरे कारण काहीतरी दुसरेच आहे पण लोक एसीमध्ये बिघाड झाला असेल असे गृहीत धरतात. तज्ञांच्या मते, एसीच्या आउटडोअर युनिटच्या जागेमुळे एसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

जर हे एसी युनिट चुकीच्या ठिकाणी, जसे की थेट सूर्यप्रकाशात किंवा बंदिस्त जागेत बसवले असेल तर त्याचा परिणाम कूलिंग आणि वीज वापर या दोन्हीवर होऊ शकतो. योग्य ठिकाणी बसवलेले आउटडोअर युनिट केवळ उत्तम कूलिंगच देत नाही, तर विजेची बचत करते आणि मशीनचे आयुष्यही वाढवते.

जर बाहेरील एसी युनिट योग्य ठिकाणी बसवले नसेल, तर कूलिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि विजेचा वापर वाढतो. योग्य ठिकाणी बसवल्यामुळे रुम लवकर थंड तर होतोच, शिवाय तुमचा खर्चही वाचतो.

एसी युनिट कुठे फिट करावे?

तज्ञांच्या मते, आउटडोअर युनिट नेहमी सावलीत ठेवणे फिट करणे बेस्ट आहे. थेट सूर्यप्रकाशात युनिट फिट केल्यास ते जास्त गरम होते, ज्यामुळे विजेचा वापर १०-१५ टक्क्यांनी वाढू शकतो आणि कूलिंग इफेक्टमध्ये अडथळा येऊ शकतो.

विजेचे बिल कसे कमी करता येईल ?

जेव्हा युनिट सावलीत असते, तेव्हा ते कमी गरम होते आणि रुममधील उष्णता अधिक सहजपणे बाहेर टाकू शकते. यामुळे कंप्रेसरवरील ताण कमी होतो आणि कमी विजेमध्ये जास्त थंडावा मिळतो.

कंप्रेसरचे वाढते आयुष्य

एसीचा सर्वात महागडा भाग म्हणजे कंप्रेसर. सतत सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या संपर्कात आल्याने तो लवकर खराब होऊ शकतो. मात्र, एसी सावलीत ठेवल्याने कंप्रेसरला जास्त गरम होण्यापासून वाचवता येते, ज्यामुळे त्याचे आयुष्य अनेक वर्षांनी वाढू शकते.

हवेचा योग्य प्रवाह

केवळ सावलीच नव्हे, तर युनिटच्या सभोवतालची मोकळी जागाही आवश्यक आहे. जर मोकळी हवा नसेल तर गरम हवा अडकून राहील, ज्यामुळे थंड होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल.

सावली नसेल तर काय करावे ?

जिथे नैसर्गिक सावली नसते, तिथे फायबरग्लास किंवा लाकडी शेड बसवता येते. फक्त त्या शेडच्या सभोवताली पुरेशी हवा खेळती राहील याची खात्री करा.

योग्य दिशा

एसी युनिट्ससाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम मानल्या जातात, कारण त्या दिशांना कमी तीव्र सूर्यप्रकाश मिळतो. पश्चिम दिशेला तोंड असलेले युनिट्स सर्वात जास्त गरम होतात.

स्वच्छता आणि देखभाल

धूळ साचल्यामुळे युनिटची थंड करण्याची क्षमता कमी होते, म्हणून ते नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे आणि वर्षातून दोनदा त्याची सर्व्हिसिंग केली पाहिजे.

लहानसा बदल

जर तुम्ही तुमच्या एसी युनिट योग्य ठिकाणी सेट करून त्याची देखभाल केली, तर तुमची विजेची बिले तर कमी येतीलच, पण तुमचा एसी जास्त काळ चांगल्या प्रकारे कामही करेल.