अनिल पंतोजी

२०२० या वर्षांत दुर्लक्षामुळे रस्ते अपघातात १ लाख २० हजार जणांचा मृत्यू झाला म्हणजे दिवसाला सरासरी ३२८ मृत्यू हे रस्ते अपघातात झाले. २०१९ या वर्षांत १ लाख ३६ हजार तर २०१८ या वर्षांत १ लाख ३५ हजार मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ ने करानाकाळातील अपघातांची नुकतीच जाहीर केलेली ही आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे. विशेष म्हणजे करोनामुळे टाळेबंदी, संचारबंदी असताना रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अल्प असताना हे मृत्यू झाले आहेत, हे अतिशय गंभीर आहे.

यावर महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेले मत हे सर्वाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. दररोज सरासरी ३२८ रस्ते अपघातात मृत्यू हे प्रादेशिक परिवहन, पोलीस आणि आणि रस्ते अभियांत्रिकीचे अपयश असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. मात्र यातून बोध घेण्यासारखी बाब म्हणजे अपघातपूर्व व अपघातपूर्वपश्चात सुरक्षा उपाययोजना या आपल्याकडे किती दुर्लक्षित आहेत, हे लक्षात येते.

वाहतूक स्थिर, शांत व सुरक्षित हवी

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक स्थिर, शांत व सुरक्षित करणे ही संकल्पना राबवावी लागणार असून प्रादेशिक परिवहन, पोलीस आणि आणि रस्ते अभियांत्रिकी विभागाने एकत्रित काम करावे लागेल. यात वाहनाचा वेग कमी करणे, पादचारी, सायकलस्वार यांना रस्त्यावर सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करणे या बाबींचा समावेश होतो.वाहनाचा वेग ३० कि.मी.पेक्षा कमी असल्यास त्या रस्त्याचा वापर पादचारी, सायकलस्वार एकत्रितपणे करू शकतात. गतिरोधक, वर्तुळाकार बेटे, बिगर-वाहन वापरास प्रोत्साहन इ. उपाययोजनांद्वारे रस्ते सुरक्षित होतील व अपघातांचे प्रमाण कमी राहील. यासाठी अपघातपूर्व व अपघातपश्चात सुरक्षा महत्त्वाची आहे. वाहनांच्या

रचनामुळे अपघात टाळता येतात. यामध्ये गतिरोधक, सिग्नल्स, वाहतूक बेट व वाहनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश

होतो. तसेच अपघात झाला तर त्याची

तीव्रता कमी करण्याकरिता वाहतूक दिवे, विविध पट्टे, अंमलबजावणी साधने, रस्त्यावरील पट्टय़ांचा समावेश आदी उपायोजना कराव्या लागतील. रस्ता सर्वाकरिता ही संकल्पना राबवावी लागेल.

चौकातील सुरक्षा

रस्ते जेव्हा एकमेकांना छेदतात किंवा मार्ग ओलांडले जातात त्या क्षेत्रात संघर्ष बिंदूची निर्मिती होते व या ठिकाणी घटना किंवा दुर्घटना घडू शकतात. रस्त्यांची रचना करताना घटना, दुर्घटना टाळता आल्या पाहिजे. परंतु जरी त्या घडल्या तरी त्यांची तीव्रता कमी करता आली पाहिजे. सुरक्षित काटरस्ता निर्मिती करताना संघर्ष बिंदू, वाहनाचा वेग व त्याचे कोनामधील अंतर वाढवणे हे तत्त्व पाळणे गरजेचे आहे. वाहतूक नियंत्रण दिवे नसलेला चौकात कमीत कमी रस्त्यावर मार्ग द्या व थांबा चिन्ह व रेषा वापरल्यास चौक सुरक्षित होतील. अनेक वेळा वाहने वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येत असतात. त्यांचा वेगही जास्त असतो व या कृतीमुळे होणाऱ्या दुर्घटनांची तीव्रता जास्त असते हे टाळण्याकरिता चौकातच प्रवेश बंदचे चिन्ह योग्य दिशेला बसवल्यास सुरक्षितता वाढेल. चौकातील सुरक्षितता बळकट करण्याकरिता त्या क्षेत्रातील संघर्ष बिंदूची संख्या कमीत कमी करून त्यात सुधारणा करावी. वाहनांचा वेग नियंत्रित करणे, योग्य रचना करावी, चौक क्षेत्रातील दाटमानता वाढवावी व सर्वात महत्त्वाचे सायकलस्वार, पादचारी यांना मुबलक जागा व संरक्षणात्मक साधने उभारणे गरजेचे आहे.

सुरक्षित कड

वाहन अनेक कारणांमुळे मार्ग सोडून खाली उतरू शकते. अशा वेळी रस्त्याची कड उघडी राहिली असल्यास वाहनास धोका निर्माण होऊ  शकतो. याकरिता रस्ता व साईड पट्टीमध्ये जास्त अंतर व खोली असता कामा नये. ती व्यवस्थित भरून घेणे गरजेचे आहे. वाहनांस सहजपणे मूळ मार्गावर येता आले पाहिजे.

वळण रस्त्यांची कड रचना बदल

वाहन वळणावर मार्ग सोडून भरकटल्यास त्यावर नियंत्रण प्राप्त करण्यास व पूर्व मार्गावर आपणांस उपयुक्त अशा रस्त्याच्या रचनेत बदल केला जातो. रस्त्याचा नजीकची जागा शक्य तितकी मोकळी केली जाते. साईड पट्टी नसल्यास किंवा असल्यास ती वाढवली जाते व जमिनीचा उतारांचे सपाटीकरण करतात. रस्त्यानजीकच्या धोकादायक गोष्टी हटवणे शक्य नसते. अशा ठिकाणी केबल बॅरिकेटस, गार्डरेक्स किंवा सिमेंटची भिंतरूपी अडथळे उभारले जातात. वरील सर्व उपाय योजनांमुळे अपघात टाळणे शक्य होते किंवा त्याची तीव्रता कमी केली जाते.

चौकातील वाहतूक दिवे

वाहतूक नियंत्रण दिवा असलेल्या ठिकाणी सुरक्षितता वृद्धिगंत करण्याकरिता वाहतूक नियंत्रण दिव्यांचे चौकटीला सीमांना पिवळा रंगाचा टेप बसवला जातो. अनेक देशात ही पद्धत स्वीकारली आहे. अंधारात वीज पुरवठा खंडित झाला असेल तेव्हा वाहनांच्या दिव्याचे परावर्तनामुळे स्थान

ओळखणे सोपे

जाते.

वाहतूक बेट (वर्तुळाकार)

वाहतूक सुरक्षित, सुरळीत व कार्यक्षमतेने होण्याकरिता वेगवेगळ्या आकाराच्या वाहतूक बेटाची रचना केली जाते. वाहनांचा वेग, संघर्ष बिंदूवर नियंत्रण राखता येते. तसेच वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित ठेवता येते. चौकातील वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. बहुमुखी आकार, रूप व कल्पनांचा वापर विविध रस्त्यांवर करता येते.

पादचारी बेट (मध्यगा व पदपथ)

वाहनांच्या आखून दिलेल्या मार्गातील उपलब्ध जागेस मध्यगा म्हणतात. यामध्ये पदपथ व बेटांचा समावेश होतो. पादचाऱ्यांना आश्रयाकरिता मार्ग उंचावलेले असतात. त्यांना आपण ‘रिफ्यूज एरिया’ म्हणून संबोधतो. पादचाऱ्यांनी रस्ता पार करताना स्वत:ची शारीरिक क्षमता, वाहनाचा वेग, पदपथाची स्थिती इ. विचार करून रस्ता पार करावा. पादचाऱ्यांनी पदपथ, स्कायवॉक, भुयारी मार्ग किंवा रस्त्याच्या कडेला आखून दिलेल्या मार्गाचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

सिग्नल मध्यंतरात पादचारी राजा

वाहतूक नियंत्रण दिव्यास्थळी हिरवा दिवा लागण्यापूर्वी जास्तीत जास्त वेळ पादचाऱ्यांना मिळालाच पाहिजे. पादचारी वाहनचालकांना आधी दिसलेच पाहिजे. पादचाऱ्यांना प्राधान्य दिल्याने दुर्घटना टळू शकतात. वाहनचालक पादचाऱ्यांना मान देतील व त्यामुळे धिम्या गतीने चालणारे वृद्ध, अपंग व्यक्ती रस्ता पार करू शकतील.

गती कमी करणारे पट्टे

वाहनचालकाची एकाग्रता भंग पावल्यामुळे, झोपेमुळे किंवा इतरत्र लक्ष गेल्यामुळे वाहन मार्ग सोडून भरकटण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. असे प्रसंग टाळण्याकरिता रस्त्याचे कडेस, अविभक्त रस्त्याचे मध्याजवळ एक सरळ भरडलेली किंवा उंचावलेली पट्टी आखतात, यालाच गती कमी करणारी (रम्बल) पट्टी म्हणतात. वाहन यावरून गेल्यास आतील लोकांना धड-धड जाणवते व त्याचा आवाज जाणवतो व त्यामुळे सर्तकता वाढते. पदपथांचा पट्टा  रंगवला असेल तर पावसाळ्यात व रात्री हेडलाईटस्चा प्रकाश त्यामधून परावर्तित होऊन  दृश्यमानता वाढीस लागते.

वाहनचालकाची एकाग्रता भंग पावल्यामुळे, झोपेमुळे किंवा इतरत्र लक्ष गेल्यामुळे वाहन मार्ग सोडून भरकटण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. असे प्रसंग टाळण्याकरिता रस्त्याचे कडेस, अविभक्त रस्त्याचे मध्याजवळ एक सरळ भरडलेली किंवा उंचावलेली पट्टी आखतात, यालाच गती कमी करणारी (रम्बल) पट्टी म्हणतात. वाहन यावरून गेल्यास आतील लोकांना धड-धड जाणवते व त्याचा आवाज जाणवतो व त्यामुळे सर्तकता वाढते. पदपथांचा पट्टा  रंगवला असेल तर पावसाळ्यात व रात्री हेडलाईटस्चा प्रकाश त्यामधून परावर्तित होऊन  दृश्यमानता वाढीस लागते.

मध्य कुंपण

’ रस्त्याचे मध्यभागी, त्यांनी समांतर असे कुंपण घातले जाते. रस्ता त्यामुळे दुभाजीत होतो व विरुद्ध दिशेने वाहनांची ये-जा कार्यक्षमतेने करता येते. मध्य कुंपणामुळे वाहन विरूद्ध मार्गात प्रवेश करू शकत नाही व त्यामुळे दुर्घटना टाळता येतात. कुंपण जाड-दणकट दोर (उुं’ी इं११्री१२), सिंमेट (उल्लू१ी३ी इं११्री१२) व तुळई (इींे ॅ४ं११िं्र’२) या तीन प्रकारे बसवले जातात.

’ जाड-दणकट दोर हे नरम असतात. त्यामुळे ते जास्त आघात सहन करू शकतात व त्यामुळे जीवितहानी टाळण्यास उपयुक्त परंतु धडकेनंतर वाहन भटकण्याची शक्यता जास्त.

’ सिंमेटची भिंत कडक असल्याने आघात सहन करू शकत नाही व त्यामुळे वाहनांचे नुकसान जास्त परंतु वाहन प्रवासाच्या दिशेने धडकेनंतर पाठवले जाते.

’ तुळईचे कुंपण अर्धकडक असते. दुर्घटनांमध्ये आघात सहन करते, स्वत:चे स्वरूप बिघडवून घेते व वाहन परत पाठवते. दुर्घटनांमध्ये तुळई व्यवस्थितरीत्या बसले नसल्यास ते वाहनांमध्ये घुसू वाहन कापले जाऊ  शकते. त्याकरिता वाहतूक व्यवस्थापनाने अभ्यास करून गरजेनुसार तुळईचा वापर केला पाहिजे.

बाजारात नवीन काय?

‘सी ३’सिट्रोनची घोषणा

चार मीटरपेक्षा कमी लांब असलेल्या नव्या

‘सी ३’ ची घोषणा नुकतीच सिट्रोन कंपनीने केली आहे. ही भारतीय ग्राहकांसाठी भारतात बनविलेली कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यापूर्वी ‘सी ५ ’ ही कार त्यांनी बाजारात आणली होती, मात्र ती आयात केली जात आहे. या कारची ग्राहकांना प्रतीक्षा होती.

उंच बॉनेट आणि रुंदी उठून दिसावी यासाठी फ्रंट एंड रचना केली आहे. हेडलाइट्स दोन स्वतंत्र घटकांपासून बनवण्यात आले  ‘सी ३’ ची वैशिष्टय़े एसयूव्हीसारखी आहेत. या वैशिष्टय़ांमध्ये चालकाच्या उंच सीटचा समावेश असून किंबहुना ही उंची या क्षेत्रात सर्वाधिक आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

 मोठे व्हील्स (६३५ एमएम), जमीनीपासूनचे अंतर (१८० एमएम) आणि रस्त्याच्या पृष्ठभागावरील अँगल्सशी जुळवून घेण्यासाठी व पुढच्या बंपरचे नुकसान टाळण्यासाठी शॉर्ट ओव्हरहँग्ज, ब्लॅक व्हील्स आर्च, बार्स रूफ्स असे सर्व घटक एसयूव्हीसारखे आहेत. पारंपरिक हॅचबॅकपेक्षा जास्त ग्राउंड क्लियरन्स (अतिरिक्त ११० एमएम) खराब रस्त्यांवर अंडरबॉडीची खरवड निघू नये यासाठी तयार करण्यात आला आहे, असा कंपनीचा दावा आहे. तीव्र उतार, खराब रस्ते किंवा रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे

पृष्ठभागाला स्पर्श होऊ  नये यासाठी त्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे. ‘सी ३ ’मध्ये ३१५ लिटर बूटचा समावेश आहे. त्याशिवाय १ लिटर ग्लोव्ह बॉक्स,

 २ लिटरचे २ डोअर पॉकेट्स पुढच्या बाजूला देण्यात आले आहेत. ही कार लवकरच बाजारात येणार आहे.