वैवाहिक जीवनात ही एक गोष्ट नसेल तर तुटू शकते पती-पत्नीचे नाते, जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीति

चाणक्य नीतीमध्ये मानव समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

lifestyle
चाणक्य जी मानतात की पती-पत्नीमध्ये विश्वास असणे खूप महत्वाचे आहे.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात जीवनाच्या जवळजवळ विषयांवर सूचना दिल्या आहेत. पैशाशी संबंधित विषय असो किंवा वैवाहिक जीवन, चाणक्य यांची धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. चाणक्य नीतीमध्ये मानव समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. असे म्हटले जाते की जो व्यक्ती आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब करतो त्याला कधीही कोणतीही समस्या येत नाही. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी आचार्य चाणक्य यांनीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यजींनी सांगितले की वैवाहिक जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे. जाणून घेऊयात.

विश्वास

चाणक्य जी मानतात की पती-पत्नीमध्ये विश्वास असणे खूप महत्वाचे आहे. दोघांचा एकमेकांवर विश्वास नसेल तर त्यांचे आयुष्य भांडणात आणि विसंवादात व्यतीत होते. त्यामुळे वैवाहिक जीवनात संशयाला जागा नाही. ज्या लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास असतो, त्यांचे जीवन सदैव आनंदी राहते.

चाणक्य जी मानतात की वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांचा सल्ला घ्यावा आणि कोणत्याही समस्येवर एकत्रितपणे तोडगा काढला पाहिजे. कारण असे केल्यानेच विश्वास दृढ होतो. ज्या नवरा-बायकोला आपल्या नात्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो, ते अगदी कठीण प्रसंगावरही सहज मात करू शकतात. चाणक्य नीतीमध्ये असेही सांगितले आहे की ज्या घरात प्रेम, वडीलधाऱ्यांचा आदर आणि शांती असते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो.

आदर

आचार्य चाणक्य जी मानतात की सुखी जीवन जगण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यात आदर असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वैवाहिक जीवनात आदर नसेल तर नात्यात कटुता येते. कधी कधी नातं तुटतं. त्यामुळे पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. याशिवाय चाणक्य जी मानतात की जर पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर अशा गोष्टी कोणाशीही शेअर करू नयेत. कारण असे केल्याने तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: According to chanakya niti these things can destroy husband wife relationship scsm

Next Story
‘या’ ५ चुकांमुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते, राहू नका बेफिकीर
फोटो गॅलरी