वास्तुशास्त्रानुसार मातीच्या ‘या’ तीन गोष्टी ठेवा घरात; चमकू शकते नशीब

वास्तुशास्त्रानुसार तज्ज्ञांच्या मते, घरात मातीची भांडी ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते.

Vaastu Shastra
वास्तुशास्त्र (फोटो: Pixabay)

शतकानुशतके भारतीय संस्कृतीत मातीची भांडी वापरली जात आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे आजच्या काळात लोक जेवणासाठी मातीची भांडी वापरत नाहीत. पण आज घर सजवण्यासाठी मातीपासून बनवलेल्या वस्तू ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. वास्तुशास्त्रानुसार मातीची भांडी वापरल्याने तुमचे नशीब चमकू शकते. तज्ज्ञांच्या मते, घरात मातीची भांडी ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते.

वास्तुशास्त्रामध्ये मातीपासून बनवलेल्या अशा तीन गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्या घरात ठेवल्याने शुभ फळ मिळते आणि करिअरमध्ये यश मिळते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी-

( हे ही वाचा: भारतीय रेल्वे IRCTC च्या ‘या’ सर्व गाड्या जुन्या वेळापत्रकानुसार धावणार; ३०% तिकिटही होणार स्वस्त )

मातीचे भांडी

जरी मातीच्या भांड्यांची जागा रेफ्रिजरेटरने घेतली असली तरी आजही आयुर्वेदाचार्य म्हणतात की मातीच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वास्तुशास्त्रानुसार मातीचे भांडे ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते. मातीचे भांडे ठेवण्याची योग्य स्थिती हे उत्तर आहे. तसेच लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की मातीचे भांडे कधीही रिकामे नसावे आणि ते नेहमी पाण्याने भरलेले असावे. असे मानले जाते की घरात मातीचे भांडे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.

मातीच्या मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार मातीच्या देवतांच्या मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात बांधलेल्या मंदिरात नेहमी मातीची मूर्ती ठेवावी. या मूर्ती तुम्ही घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरात वास करते आणि घरात सुख-समृद्धी वाढते.

( हे ही वाचा: मोबाईल नंबर फक्त १० अंकीच का असतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण )

मातीचा दिवा

लोक सध्याच्या काळात पूजेसाठी धातूचे दिवे वापरतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात मातीचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: According to vaastu shastra keep these three things in the house luck may shine ttg

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या