scorecardresearch

वास्तुशास्त्रानुसार घरात ‘ही’ झाड लावल्यास मिळते सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने सर्व तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते असं मानले जाते.

Vaastu Shastra
वास्तुशास्त्रानुसार ही झाड शुभ मानली जातात (फोटो:Pixbay)

आजकाल बहुतेक लोक आपल्या घरात झाडं लावतात. यामुळे केवळ पर्यावरण शुद्ध होत नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील येते. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने सर्व तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते असं मानले जाते. या वनस्पतींमुळे घरात आनंदाचे वातावरण राहते. लक्ष्मीची विशेष कृपा होण्याबरोबरच व्यक्ती कर्ज आणि रोगांपासून मुक्त होते असही म्हटल जात. जाणून घ्या कोणत्या अशा वनस्पतींना आनंद आणि समृद्धीसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते.

तुळशी: बहुतेक लोक आपल्या घरात ही वनस्पती लावतात. ही वनस्पती हिंदू धर्मात आदरणीय मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार या वनस्पतीला घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. परंतु या वनस्पतीच्या देखभालीसाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की ही वनस्पती ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावी. ही वनस्पती घराच्या अंगणात ठेवता येते. तुळशीच्या रोपासमोर संध्याकाळी दिवा लावावा. असे मानले जाते की असे केल्याने आई लक्ष्मीची कृपा कायम राहते. या रोपाभोवती स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्यावी.

मनी प्लांट: वास्तुशास्त्रानुसार, ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक संकट दूर होते. ही वनस्पती जितकी हिरवी असेल तितकी चांगली असं मानले जाते. हे झाड नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे.

शमी वनस्पती: ही वनस्पती शनिदेवाची आवडती मानली जाते. वास्तुनुसार, ही वनस्पती मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावी आणि त्याच्या समोर संध्याकाळी दिवेही लावावेत. असे म्हटले जाते की या रोपाची लागवड केल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होते आणि रोगांपासून सुटका होते. असेही मानले जाते की ही वनस्पती कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणते.

बांबूचं झाड: वास्तू नुसार घरात बांबूचं झाड लावणे देखील खूप शुभ मानले जाते. हे दुर्दैव दूर करते आणि सौभाग्य वाढवते असही म्हटले जाते. घरात हे झाड ठेवल्याने संपत्ती आणि अन्नधान्य वाढते असे मानले जाते.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-08-2021 at 18:41 IST

संबंधित बातम्या