scorecardresearch

अभिनेत्याने काही इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ८५ लाख; आता कसा दिसतो पहा?

चांगली उंची असावी असे सगळ्यानांच वाटते. पण त्यासाठी ८५ लाख खर्च करणे म्हणजे…

अभिनेत्याने काही इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले ८५ लाख; आता कसा दिसतो पहा?
अभिनेता रिच रोटेला

चांगली उंची, चांगली बॉडी कुणाला नको असते. त्यातच सिनेसृष्टी किंवा मॉडलेंग क्षेत्रातील लोक असतील तर त्यांच्यासाठी या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. अनेक अभिनेत्री, अभिनेते कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीवर लाखो रुपये खर्च करतात. सामान्य माणसांना मात्र असे उपदव्याप करणे शक्य नाही. अमेरिकेतल्या एका अभिनेत्याने मात्र उंची वाढविण्यासाठी हा उपदव्याप केला. या पठ्ठ्याने उंची वाढविण्यासाठी तब्बल ८५ लाख खर्च केले आहेत. हो ८५ लाख! तुम्ही विचार कराल ८५ लाखात आपण काय काय करु शकतो. या अभिनेत्याने ८५ लाख खर्च केल्यानंतर किती उंची वाढली ते बघा.

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मधील कलाकार रिच रोटेला आपल्या कमी उंचीमुळे त्रासलेला होता. ही कमी उंची काही खूपच कमी नव्हती. रिच पाच फूट पाच इंचाचा होता. आता उंची वाढविण्यासाठी ८५ लाख खर्च केल्यानंतर काहीतरी रिझल्ट तर मिळणारच ना. रिचची उंची ऑपरेशनंतर वाढली. पण उंची वाढविण्याचे त्याचे कारण आणि ऑपरेशन नंतर त्याची वाढलेली उंची पाहून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.

रिच रोटेला याला मुलींना डेट करण्यासाठी आणि चांगला अभिनय व्हावा यासाठी उंची वाढवायची होती. त्यासाठी त्याने लेग लेंथिग सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीवर त्याने तब्बल ८५ लाख खर्च केले. एवढे खर्च केल्यानंतर त्याची उंची झाली पाच फूट आठ इंच. म्हणजे केवळ तीन इंचाने त्याची उंची वाढली. म्हणजे एका इंचाचा हिशोब केला तर रिचने एक इंचासाठी तब्बल २८.३३ लाख रुपये खर्च केलेत. रिच रोटेलाने ऑपरेशननंतर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, “पाच फूट पाच इंच झाल्यानंतर माझी उंची वाढणे बंद झाले होते. त्यामुळे उंच मुलींना मी डेट करु शकतो नव्हतो. प्रसिद्ध अभिनेता बनण्यासाठी मला उंची वाढवावी, असे वाटत होते. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.”

दर मिररने दिलेल्या बातमीनुसार रिच आपल्या उंचीला घेऊन खूपच काळजी करत असल्याचे दिसते. उंची कमी असल्यामुळे तो बास्केटबॉल टीममध्ये सामील होऊ शकला नव्हता, याची बोचही त्याच्या मनात होती. मी खूप चांगला बास्केटबॉल खेळायचो. पण फक्त उंची कमी असल्यामुळे मला टीममध्ये घेतले नाही. हे एक कारण होते, ज्यामुळे मला उंची वाढवावी असे मनोमन वाटत होतं.

कसा होता ऑपरेशनचा अनुभव

वर वर पाहता हे प्रकरण मजेशीर वाटत असलं तरी रिचचे ऑपरेशन तेवढं सोपं नव्हतं. लाखो रुपये खर्च करुन रिचला तीन महिने फिजिओथेरेपी करावी लागली. तीन महिने त्याला व्हिलचेअरवर बसून राहावे लागले. तीन महिन्यांनंतर तो कुबड्या घेऊन चालत होता. मग हळूहळू तो चालण्यासाठी तयार झाला. रिच म्हणतो, हा अनुभव खूप त्रासदायक होता. शरिर खूप दुखायचं. पण हे करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हे केल्यानंतरच आज माझी तीन इंच उंची वाढू शकली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 15:15 IST

संबंधित बातम्या