अपचनाचा त्रास आता इतका कॉमन झाला आहे की अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत, महिला, पुरुष, सगळ्यांना याची प्रचिती येतेच. असं असूनही अपचन, गॅस, बद्धकोष्ठता हे त्रास सहसा हसण्यावारी घेतले जातात. पण जर वेळीच लक्ष दिले गेले नाही तर अपचनाने मोठा अपाय होऊ शकतो. पोटाचे विकार, वाढते वजन, हृदयात जळजळ अशा समस्यांना सामोरे जायचे नसेल तर वेळीच अपचन दूर केले पाहिजे. पोटातील गॅस वर सर्वात सोपा उपाय म्हणजे आहारात बदल. व अपचन दूर करण्याचा एक गोल्डन रुल म्हणजे प्रत्येक मील नंतर थोडे चालणे. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे खूप महत्त्वाचे आहे.पण समजा काही कारणास्तव तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही बसल्या जागी काही सोपे उपाय करून अपचनावर मात करू शकता.

  1. अपचनावर पहिला उपाय म्हणजे जेवण झाल्यावर वज्रासन करा. यामुळे तुमच्या पोटावर गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.तसेच खांदे आणि पाठीचा कणा सरळ राहतो.
  2. जर तुम्हाला खूप गॅस झाला असे वाटत असेल तर नाभीला जोडून अंगठा व करंगळीच्या मधील तीन बोटे गोलाकार फिरवा. यामुळे पोटातील गॅस बाहेर पडायला मदत होते.
  3. जर तुम्हाला अपचनामुळे छातीत जळजळ जाणवत असेल तर दूध घेण्यापेक्षा दह्यात सैंधव मीठ घालून खा. यातील ऍसिडिक तत्त्वांमुळे पोटातील गॅस बबल्स कमी होतात.
  4. जर तुम्हाला अपचनामुळे मळमळ होत असेल तर बडीशेप किंवा लवंग चघळावी.
  5. जर अपचनामुळे पोटात दुखत असेल तर ओव्यांमध्ये किंचित आळशी टाकून खावी. यामुळे पोट साफ होण्यास सुद्धा मदत होते.

Home Remedies: स्ट्रेच मार्क्सवर खर्च करताय हजारो रुपये? आजीच्या बटव्यातील ‘हे’ उपाय आहेत स्वस्तात मस्त

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला अपचनाचा वारंवार त्रास होत असेल तर सोडायुक्त पेय त्यावर उपाय नाही. पहिली गोष्ट अपचनात सोडा प्यायल्याने तुम्हाला तात्काळ बरे वाटते पण तुमच्या पोटात मात्र आणखी गॅस बबल्स तयार होतात. यापेक्षा अधिकाधिक नैसर्गिक उपायांवर भर द्या. आणि मुख्य म्हणजे शतपावलीची सवय लावून घ्या.