Rahu Gochar 2022: शनि ग्रहाप्रमाणेच राहु देखील आपली राशी संथ गतीने बदलतो. राहूची राशी २०२१ मध्ये बदललेली नाही, जी आता २०२२ मध्ये होणार आहे. या ग्रहाला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी सुमारे १.५ वर्षे लागतात. सध्या राहू वृषभ राशीत गोचरत असून १२ एप्रिलपासून मेष राशीतून गोचर सुरू होईल. राहु नेहमी प्रतिगामी गतीमध्ये म्हणजेच उलट दिशेने फिरतो. राहू सुमारे १८ वर्षे ७ महिन्यांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीवर या संक्रमणाचा खूप शुभ प्रभाव राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिथुन

या राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण शुभ राहील. तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ अनुकूल आहे. नवीन योजनांवर काम करू शकाल. आर्थिक लाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकेल.

( हे ही वाचा: Marriage Horoscope 2022: नवीन वर्षात तुमचे लग्न होईल की नाही? या ‘५’ राशींसाठी आहे खुशखबर)

कर्क

हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या सुविधांवर पैसे खर्च कराल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावे लागेल. कामात लक्ष दिल्यास बरे होईल. आर्थिक यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

( हे ही वाचा: सासरी ‘या’ राशीच्या मुलींच्या शुभ पावलांनी येते आर्थिक समृद्धी, जाणून घ्या काय आहे विश्वास)

तूळ

या राशीच्या लोकांना राहूच्या संक्रमणामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यावसायिक जीवन सुधारण्यासाठी तुम्ही नवीन धोरणे तयार कराल. नोकरीत बदल किंवा बदली होण्याची दाट शक्यता आहे.

( हे ही वाचा: ब्लड शुगर सोबत काजू हाय बीपीही ठेवते नियंत्रित; जाणून घ्या इतर फायदे )

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. नोकरीत लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमचे मनोबल उंच राहू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 18 years rahu will enter aries this will bring happiness and prosperity in the lives of people of 4 zodiac signs ttg
First published on: 15-12-2021 at 17:56 IST