एअरटेल, व्होडाफोन आयडियानंतर Amazon Prime सब्सक्रिप्शन होणार महाग; वार्षिक ९९९ रुपयांचं पॅकेज आता…

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप ५० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहे.

amazon-prime-video
एअरटेल, व्होडाफोन आयडियानंतर Amazon Prime सब्सक्रिप्शन होणार महाग; वार्षिक ९९९ रुपयांचं पॅकेज आता…

एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंतर आता अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपही महाग होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम भारतात पाच वर्षांपूर्वी आले होते. अल्पावधीत अनेकजण अ‍ॅमेझॉन प्राइमचे मेंबर झाले आहेत. मनोरंजन, चित्रपट, वेब सीरिज यामुळे तरुणांमध्ये हे अ‍ॅप लोकप्रिय आहे. मात्र आता अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप ५० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहे. वाढीव रुपये १३ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. सध्या ९९९ रुपये वार्षिक मेंबरशिप असलेलं पॅकेज १,४९९ रुपये होणार आहे. वार्षिक सभासदत्वाची किंमत ५०० रुपयांनी वाढणार आहे. मासिक आणि त्रैमासिक सब्सक्रिप्सनवरही याचा परिणाम होईल. नव्या अपडेटनंतर अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपसाठी ९९९ रुपयांच्या पॅकची किंमत १,४९९ रुपये असेल. त्याची वैधता १२ महिने आहे. त्याच वेळी, ३२९ रुपयांच्या तिमाही प्लॅनची ​​किंमत ४५९ रुपये असेल आणि १२९ रुपयांच्या मासिक प्लॅनची ​​किंमत १७९ रुपये असेल.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप असलेल्या ग्राहकांना विशेष ऑफर मिळतात आणि सेल दरम्यान इतर ग्राहकांआधी खरेदी करण्याची संधी मिळते. याशिवाय अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, अ‍ॅमेझॉन म्युझिक, प्राईम रिडिंग आणि प्राईम गेमिंग देखील उपलब्ध आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईम मे २०२१ पासून प्राइम युथ ऑफरचा भाग असलेल्या १८ ते २४ वयोगटातील ग्राहकांसाठी किंमती बदलणार आहे. तथापि, नवीन अपडेटनंतर, तरुण ग्राहकांना फायदा होणार आहे, कारण तरुण ग्राहकांसाठी मासिक आणि त्रैमासिक प्राइम मेंबरशिपची किंमत १६४ रुपयांवरून ६४ रुपये आणि २९९ रुपयांवरून ८९ रुपये आणि वार्षिक फी ७४९ रुपयांवरून ४९९ रुपये करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After airtel vodafone idea amazon prime subscription will be expensive rmt

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या