Essential Blood Tests For Women: घरातील प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. घरातील सर्व कामे तसंच बाहेरची नोकरी, या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळून घेण्यात महिला पटाईत असतात. घरातील प्रत्येकाची काळजी त्या घेतात. पण, यावेळी मात्र त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होत. घरात आणि बाहेरच्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. मात्र, वाढत्या वयानुसार प्रत्येक महिलांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं. वयाच्या तिशीनंतर महिलांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार, महिलांना उच्च कोलेस्टेरॉल, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. त्यांना टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी. चला तर मग जाणून घेऊया वयाच्या ३० वर्षांनंतर महिलांनी कोणत्या ५ चाचण्या कराव्यात.

१) संपूर्ण रक्त गणना (Complete blood count)

संपूर्ण रक्त गणनाला इंग्रजीमध्ये CBC म्हणतात. या रक्ततपासणीच्या माध्यमातून महिलांच्या एकूण आरोग्याची माहिती घेता येते. कोणत्याही प्रकारचे संक्रमण, अशक्तपणा, विकार आणि काही प्रकरणांमध्ये कर्करोग देखील CBC द्वारे शोधला जाऊ शकतो. संपूर्ण रक्त गणना लाल रक्त पेशी (RBC), पांढऱ्या रक्त पेशी (WBC), हिमोग्लोबिन, हेमॅटोक्रिट (Hct) आणि प्लेटलेट्सची संपूर्ण माहिती देते.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

(हे ही वाचा: लहान वयातच ‘या’ सवयींमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात; आतापासूनच घ्या काळजी)

२) लिपिड प्रोफाइल (Lipid profile)

लिपिड प्रोफाइल चाचणी रक्तातील विशिष्ट चरबीच्या रेणूंचे प्रमाण मोजते. या चाचणीत अनेक प्रकारचे कोलेस्टेरॉल शोधले जाऊ शकतात. ही चाचणी हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य तपासण्यासाठी मदत करते. लिपिड प्रोफाइलचा मागोवा घेतल्यास खाण्याच्या सवयी, आहार, तणाव, व्यायाम आणि जीवनशैली सुधारता येते. थायरॉईड किंवा पॉलीसिस्टिक अंडाशय रोग सहसा खराब लिपिड प्रोफाइलशी संबंधित असतात.

पाहा व्हिडीओ –

३) थायरॉईड कार्य चाचणी (Thyroid function test)

भारतातील १० पैकी १ महिला थायरॉईड समस्येने ग्रस्त आहे. ३० वर्षांनंतरच्या महिलांनी थायरॉईड चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी येणे, अचानक वजन वाढणे, केस गळणे किंवा वंध्यत्व ही थायरॉईडची सामान्य लक्षणे आहेत.

( हे ही वाचा: मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदलून पाहा…)

४) रक्तातील साखर (Blood sugar)

अनेक महिला ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होताच मधुमेहाला बळी पडतात. मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन योग्य प्रकारे तयार होत नाही. ऊर्जा आणि रक्तातील साखर वापरण्यासाठी इन्सुलिन आवश्यक आहे. वयाच्या ३० वर्षानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होण्याची संभावना असते. त्यामुळे ब्लड शुगर ची चाचणी वयाच्या तिशीनंतर करून घेणे आवश्यक आहे.

५) पॅप स्मीअर चाचणी (Pap smear)

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पॅप स्मीअर स्क्रीनिंगद्वारे गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत शोधला जाऊ शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, ३० किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांनी दर ५ वर्षांनी एकदा पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे.