Akshaya Tritiya 2026 Shubhechha : हिंदू धर्मीयांमध्ये अक्षय्य तृतीया या सणाला प्रचंड महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते संपूर्ण होते, असे म्हटले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे हा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतो.
सध्या कोणत्याही सण-उत्सवाच्या निमित्ताने सर्वांत आधी फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट केले जातात. आपण स्वतःही असे फोटो एडिट करून बनवू शकता. पण, तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आम्हीच तुमच्यासाठी काही खास मराठमोळ्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. खाली अक्षय्य तृतीयेनिमित्त विशेष शुभेच्छा तयार केल्या आहेत, ज्या तुम्ही डाऊनलोड करून, तुमच्या सोशल मीडियावर मोफत शेअर करू शकता.
आनंदाचे तोरण बांधा दारी
सुंदर रांगोळी काढा दारी
सुखासमाधानाचा असो प्रत्येक दिवस
लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळो प्रत्येक क्षेत्रात यश
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या घरावर होईल धनाची बरसात
लक्ष्मीचा राहील वास
संकटाचा होईल नाश
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मी कृपेने खुलणार नशीबाचं दार
सोन्या प्रमाणे उजळणार आयुष्य आज
सुख-समृद्धी-ऐश्वर्याची एंट्री होवो घरात
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या घरात धन-संपत्तीचा वर्षाव होवो,
माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

संकटांचा होईल नाश
धनाचा होईल वर्षाव
यश व प्रगतीसाठी लक्ष्मीचा मिळो सदैव आशीर्वाद
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
सुख-समृद्धीचा वर्षाव
भाग्य आणि नशिबाची साथ
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुमच्या सर्व कामांना मिळो लक्ष्मी कृपेचा आशीर्वाद!
सोनेरी दिवस, सोनेरी क्षण
भरभराटीचा जाईल प्रत्येक दिवस
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक स्वप्न होईल साकार
यश मिळो वारंवार
अक्षय तृतीयेचा हा दिवस
आनंद देईल अपार!

आनंद आणि यश कायमच तुमच्यापाशी राहो!
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आकाशासारखा विस्तार असो तुमच्या यशाला
हॅपी अक्षय तृतीया अशा शुभेच्छा मनापासून सगळ्यांना!
