Akshaya Tritiya 2022 Date & time in India: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवसाला शुभ तिथी मानले जाते. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, यासह कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय्य तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे.

शुभ मुहूर्त कधी आहे?

अक्षय्य तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. या दिवशी रोहिणी नक्षत्र राहील. रोहिणी नक्षत्र ४ मे रोजी सकाळी १२:३४ ते ०३:१८ पर्यंत राहील.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
5th April Panchang Papmochani Ekadashi Rashi Bhavishya
५ एप्रिल पंचांग: पापमोचनी एकादशी तुमच्या राशीला लाभणार का? मेष ते मीन राशीपैकी कुणाला लाभेल विठ्ठलाची कृपा?
1st April Marathi Rashi Bhavishya
१ एप्रिल पंचांग: महिन्याचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल? ‘या’ राशींच्या लोकांसाठी धन व प्रगतीचे संकेत

(हे ही वाचा: Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश!)

असे मानले जाते की भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला होता. याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते. भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता गंगा पृथ्वीवर आली असेही सांगितले जाते. मान्यतेनुसार या दिवशी माता अन्नपूर्णाचा जन्म झाला होता. या दिवशी विधीनुसार स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा केली जाते. असे म्हणतात की महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय्य पत्र दिले होते. असे म्हटले जाते की अक्षय्य पत्र कधीही रिकामे नसते आणि नेहमी अन्नाने भरलेले असते.

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेदी केल्याने समृद्धी येते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे. ज्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी तसेच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पंचांग पाहण्यासाठी शुभ मुहूर्त काढण्याची गरज नसते.