Akshaya Tritiya 2022 Wishes in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय्य तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवसाला शुभ तिथी मानले जाते. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, यासह कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी शुभ कार्य करता येते. याच शुभ दिनी तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश (Wishes, Images, Messages, Quotes, Status, Wallpapers) घेऊन आलो आहोत.

(हे ही वाचा: Akshaya Tritiya 2022: कधी आहे अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त? जाणून घ्या)

या अक्षय्य तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

प्रत्येक काम होवो पूर्ण,
न काही राहो अपूर्ण,
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन,
घरात होवो लक्ष्मीचं आगमन,

अक्षय्य राहो सुख तुमचे…
अक्षय्य राहो धन तुमचे…
अक्षय्य राहो प्रेम तुमचे…
अक्षय्य राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा!!

अक्षय्य होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे विजय आणि
तोंड काळे होवो द्वेष करणाऱ्याचे !
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!!

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या
कृपेसोबतच…
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही
वर्षाव होवो..
अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

“जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”

ही अक्षय्य तृतीय तुमच्या कुटुंबाला
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो
हीच आमची कामना
अक्षय्य तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..
शुभ अक्षय्य तृतीया !

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(क्रेडीट: सोशल मीडिया)