२०२२ मध्ये लॉंच होणारे सर्व iPhone हॅंडसेट्स असतील 5G कॅपेबल?

सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये लॉंच होणाऱ्या सर्व आयफोन मॉडेल्समध्ये 5 जी-इंटरनेट कॅपेबलिटी असणार असल्याची माहिती मिळत आहे.

All iPhone handsets to be launched 2022 will be 5G capable gst 97
iPhone SE च पुढील व्हर्जन Apple चा सर्वात स्वस्त 5 जी ऑफर फोन असेल.

२०२२ मध्ये लॉंच होणारे iPhone हॅंडसेट्स ५-जी कॅपेबल असणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘निक्केई’ने (Nikkei) सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. पुढील वर्षी लॉंच होणाऱ्या सर्व आयफोन मॉडेल्समध्ये ५-जी इंटरनेट कॅपेबलिटी असणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात पुढील २ वर्षात नव्या बदलांसह येणाऱ्या Apple च्या बजेट हँडसेट iPhone SE चा देखील समावेश असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २०२२ पासून कपर्टीनो कंपनी कोणतीही नवी ४-जी मॉडेल्स लॉंच करणार नाही. त्याचप्रमाणे अ‍ॅपल पुढच्या वर्षी कोणतंही अपडेटेड आयफोन मिनी व्हर्जन लॉंच करणार नाही. विक्रीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आला आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

काय म्हणतो अहवाल?

नुकत्याच आलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आयफोन एसई (२०२०) सिरीजचा सक्सेसर म्हणजेच पुढचं व्हर्जन असलेल्या आयफोन एसई ३ (iPhone SE 3) मध्ये अ‍ॅपल ए १४ बियोनिक एसओसी (Apple A14 Bionic SoC) असणार आहे. वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये लॉंच होईल. आयफोन एसई (२०२०) हा ए १३ बियोनिक (A13 Bionic) द्वारा समर्थित असणार आहे. अ‍ॅपल ए १४ बियोनिक (Apple A14 Bionic) सह अ‍ॅपलचा नवीन बजेट फोन हा आयफोन १२ सिरीज आणि आयपॅड एअरच्या (iPhone 12 series iPad Air) बरोबरीचा असेल.

iPhone SE चं पुढील व्हर्जन असेल अ‍ॅपलचा सर्वात स्वस्त ५ जी ऑफर फोन

विश्लेषक मिंग-ची कुओ यांच्यानुसार,आयफोन एसईचं (iPhone SE) पुढील व्हर्जन अपलचा सर्वात स्वस्त ५ जी ऑफर फोन असेल. कुओ यांनी म्हटेल आहे की, डिझाइन्सचा विचारता करता ते साधारणत: सध्याच्या आयफोन एसई (२०२०) प्रमाणेच असतील.

२०१६ साली आयफोन ५s (iPhone 5s) ची जागा घेण्यासाठी पहिला आयफोन एसई लॉंच करण्यात आला होता. तो Apple A9 SoC सह आला मात्र त्याची रचना आयफोन 5s प्रमाणेच होती. त्यानंतर २०२० मध्ये, अ‍ॅपलने आयफोन एसई (२०२०) हे नवीन जनरेशनचा फोन बाजारात आणला. ज्याची डिझाईन आयफोन ८ (iPhone 8) प्रमाणेच होती मात्र त्यात Apple A13 Bionic SoC चा समावेश होता. आता यापुढील आयफोन एसई अपग्रेडेड इंटर्नल्ससह येणार असून त्याची डिझाईन मात्र सारखीच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या एप्रिल महिन्यामध्ये मात्र अशी अफवा पसरली होती की आयफोन एसई ३ मध्ये ७.७ इंचाचा डिस्प्ले असेल जो आताच्या आयफोन एसई जनरेशन सारखाच असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All iphone handsets launched in 2022 5g capable report gst

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण