शेतीतील आधुनिकीकरणामुळे जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये केली जाणारी बदामाची शेती आता महाराष्ट्रातही शक्य होत आहे. बदामाचे एकंदरीत बाजारभाव बघता व्यवयसायिक स्तरावर बदाम शेती केल्यास आर्थिक उत्पन्न वाढू शकते. बदामाची बाजारात मागणी कायम असल्याने या पिकाचे उत्पादनही हातोहात विकले जाते. याशिवाय बदाम २४० दिवस सहज साठवून ठेवता येतो त्यामुळे शेतमालाची साठवणूक करण्याचा कोणताही त्रास शेतकऱ्यांना होत नाही. या शेतीसाठी बदामाच्या काही विकसित प्रजाती वापरण्याचा सल्ला शेती तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ज्याविषयी आपण आज या लेखातून माहिती घेणार आहोत.

नॉन-पॅरील, कॅलिफोर्निया पेपर शेल, मर्सिड, IXL, प्रिमोर्स्की, पीअरलेस, कार्मेल, थॉम्पसन, प्राइस, बट्टे, मॉन्टेरे, रुबी, फ्रिट्झ,शालिमार, मखदूम, वारिस, प्रनायाज, प्लस अल्ट्रा, सोनोरा या व अशा काही बदामाच्या प्रजाती सर्वाधिक उत्पादन मिळवून देतात. बदाम लागवडीच्या बाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे पाणी किती लागणार? कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार बदाम लागवडीत अन्य पिकांइतकेच पाणी लागते. मात्र बदामाचे झाड हे एकदा पूर्णपणे वाढल्यावर भविष्यात त्याला अधिक पाणी देण्याची गरज नसते.

loksatta analysis increasing sugar production in maharashtra
विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
Maharashtra maintains monopoly in sugar production
साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम; सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका वेळी केलेली बदाम लागवड तब्बल पन्नास वर्षे उत्पादन देण्यास सक्षम असते. त्यामुळे बदामाची शेती हे पन्नास वर्षे उत्पन्न देणारे साधन बनू शकते. बदामाच्या शेतीत गुंतवणूक करणे हे कमी होकार व अधिक नफ्याचे माध्यम ठरू शकते. आपण प्रत्यक्ष आकडेमोड पाहुयात, बदामाच्या एका सुपीक झाडावर तब्बल २३- ३० किलो बदाम मिळतात, सध्या बाजारात बदामाचा दर हा जवळपास १००० रुपये प्रति किलो असा आहे. शेतीचा व साठवणुकीचा खर्च वगळता बदामाच्या एका झाडातूनही इतर पिकांच्या तुलनेत अधिक नफा मिळवता येतो.

सद्य घडीला अमेरिका हा बदाम लागवडीतील अग्रेसर देश आहे. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी बदाम लागवडीतून तब्ब्ल 11 अब्ज डॉलरचा हातभार लागतो. 100,000 पेक्षा जास्त लोकांना या प्रक्रियेतून रोजगार मिळतो. भारतातही आधुनिक शेतीच्या माध्यमातून बदामाची लागवड करण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात सध्या जम्मू काश्मीर येथे बदामाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.