बहुतेक जण पाठीवर पिंपल्स आणि अॅक्नेमुळे त्रासलेले असतात. हे तणाव, घाम आणि खराब हार्मोनल आरोग्यामुळे होते. पण, त्यामुळे विशेषत: महिलांना बॅकलेस ब्लाउज, ड्रेस घालताना अवघडल्यासारखे होते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. हे केवळ त्वचेमधील मृत पेशींमुळे होत नाही, तर वैद्यकीय कारणांमुळेही घडते. जसे की, खराब हार्मोनल आरोग्य, तणाव व घाम यामुळे हे होते. काही वेळा कपड्यांमुळे होणाऱ्या अॅलर्जीमुळे असे होते. अशा परिस्थितीत पाठीवरच्या पिंपल्ससाठी तुम्ही हा घरगुती उपाय करून पाहू शकता. कारण- यातील अँटीबॅक्टीरियल गुणधर्म त्वचेतील बॅक्टेरिया नष्ट करू शकतात आणि त्यांचा प्रसार रोखू शकतात. त्याशिवाय या उपायांमुळे जे अनेक फायदे होतात, ते काय आहेत जाणून घेऊ…

पाठीवरील पिंपल्सच्या त्रासावर कोरफड अन् हळद गुणकारी

पाठीवर पिंपल्सची समस्या जावणत असेल, तर तुम्ही कोरफड आणि हळदीचे मिश्रण लावू शकता. त्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये अर्धा चमचा हळद मिसळा आणि संपूर्ण पाठीवर लावा. १० मिनिटे तो लेप तसाच राहू द्या. त्यानंतर स्क्रब करून थंड पाण्याने धुऊन टाका.

Important aspects of bike maintenance
बाईक मेंटेनन्सच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष
struggle makes us stronger a child doing struggle to sell raincoats in the pouring rain video will bring tears in your eyes
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो! भर पावसात रेनकोट विकण्यासाठी चिमुकल्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल, VIDEO Viral
Healthy Midnight Snacks Option
रात्री तूप लावलेला ‘हा’ पराठा खाल्ल्याने पचनही होईल वेगवान; तीन वस्तू वापरून करायची रेसिपी व फायदे जाणून घ्या
This is what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm
रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
How to save people who are swept away by floods
लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO
What do you do to prevent corrosion of a car Follow these tips
कारच्या गंज प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी काय कराल? फॉलो करा ‘या’ टिप्स
Animal Attack Video
अवघ्या ३० सेकंदांत कोमोडो ड्रॅगनने हरणाला केलं फस्त; जंगलातील Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
benefits of pumpkin seeds
भोपळ्याच्या बिया अन् निळ्या रंगाच्या ‘या’ फळामुळे होणारे फायदे वाचा, सेवन करण्याची योग्य वेळ कोणती?

पाठीवरील मुरुमांवर हळद अन् कोरफडीचे फायदे

कोरफड आणि हळद या दोन्हींमध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करून, ते नष्ट करणारे गुणधर्म आहेत. या दोन्ही वनस्पतींच्या वापरामुले अॅक्नेमधील जीवाणू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे तेलकट त्वचा स्वच्छ करण्यास मदत होते आणि नंतर त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकता येतात. हळद स्क्रबर म्हणून काम करते; तर कोरफड त्वचेला आर्द्रता प्रदान करते. या दोन्हींच्या वापरामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि पिंपल्स कमी होतात.

कोरफड आणि हळदीचा एक फायदा म्हणजे दोन्हींमुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होतात. तसेच, हळूहळू तुमच्या त्वचेतील पिग्मेंटेशन कमी होते आणि मग त्वचा आतून उजळू लागते. त्यामुळे दोन्हींचा वापर त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तेव्हा तुम्हालाही पाठीवर पिंपल्स येण्याची समस्या असेल, तर हा उपाय एकदा अवश्य करून पाहू शकता.