scorecardresearch

‘या’ ४ आजारांवर औषधाप्रमाणे काम करतात पांढरे तीळ; फक्त कधी आणि कसे खावेत जाणून घ्या

What are the benefits of Eating White Sesame: ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी तीळाचे सेवन करावे, साखर नियंत्रणात राहील.

‘या’ ४ आजारांवर औषधाप्रमाणे काम करतात पांढरे तीळ; फक्त कधी आणि कसे खावेत जाणून घ्या
photo: freepik

What are the benefits of Eating White Sesame: हिवाळ्यात तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. या ऋतूत तिळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात. तिळाचे दोन प्रकार आहेत, काळे आणि पांढरे तीळ. दोन्ही प्रकारचे तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असलेल्या तीळाचे सेवन केल्याने हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळतो.

प्रथिने, कॅल्शियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या तिळाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, तिळाच्या सेवनाने अनेक आजारांवर उपचार करता येतात. तिळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि वजनही नियंत्रणात राहते. तीळ खाल्ल्याने कोणते रोग बरे होतात हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हिवाळ्यात सांधेदुखीच्या समस्येवर उपचार करतात

जर तुम्हाला सांध्यांमध्ये भरपूर वेदना होत असतील तर तुम्ही तीळाचे सेवन करावे. तिळाच्या तेलाने वेदनादायक भागाची मालिश देखील करू शकता. तिळाच्या बियांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारी ऑस्टिओपोरोसिसची समस्या दूर करते. कॅल्शियम युक्त तीळ हाडांच्या दुखण्यापासून आराम देते.

तिळाच्या सेवनाने साखर नियंत्रित राहते

पौष्टिक तत्वांनी युक्त तीळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तिळामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात, तसेच प्रथिने आणि हेल्दी फॅट देखील त्यात आढळतात, जे डायबिटीजमध्ये फायदेशीर ठरतात. मधुमेहाच्या रुग्णांनी तीळाचे सेवन करावे, याने शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा दूर होतो.

( हे ही वाचा: एका आठवड्यात किती प्रमाणात दारूचे सेवन आरोग्यासाठी सुरक्षित आहे? डॉक्टर सांगतात “पिण्याची पद्धत..”)

तीळ हृदय निरोगी ठेवते

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, तिळामध्ये ४१ टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आढळते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत ते तिळाचे सेवन करू शकतात.

मासिक पाळीच्या समस्येमध्ये तिळाचा वापर या प्रकारे करता येतो

ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान वेदना आणि अस्वस्थता जाणवते त्यांनी तीळाचे सेवन करावे. मासिक पाळीच्या ४ ते ५ दिवस आधी तिळाच्या बियांचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि व्र
कॅम्प्सपासून आराम मिळेल. ५ ग्रॅम तीळ बारीक ठेचून त्याचा काढा तयार करून सकाळ संध्याकाळ सेवन करा. या काढाच्या सेवनाने शरीरावर औषधाप्रमाणे परिणाम होतो. या काढाचे सेवन केल्याने मासिक पाळी नियमित राहते आणि हार्मोन्स ठीक राहतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 17:01 IST

संबंधित बातम्या