Amazon ची वार्षिक प्राइम मेंबरशिप फी ५०% ने वाढवणार! जाणून घ्या अधिक तपशील

अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी लवकरच भारतातील आपले प्राइम मेंबरशिप फी बदलणार आहे.

Amazon-1-3
अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप (फोटो: इंडियन एक्स्प्रेस)

अॅमेझॉन वापरकर्त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अमेझॉन प्राइम व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर त्याच्या प्राइम मेंबरशिपद्वारे लाखो वस्तूंच्या एक दिवसाच्या वितरणाची सुविधा प्रदान करते.अॅमेझॉनने भारतातील आपली प्राइम मेंबरशिप फी ५० टक्क्यांनी वाढवून सध्याच्या ९९९ रुपयांपासून प्रति वर्ष १,४९९ रुपये करेल. यासह, कंपनी दरमहा आणि तीन महिने सबस्क्रिप्शन फी देखील वाढवेल.

अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी लवकरच भारतातील आपले प्राइम मेंबरशिप फी बदलणार आहे. वार्षिक सदस्यता शुल्क ९९९ रुपयांवरून १,४९९ रुपये तर तीन महिन्यांची सदस्यता शुल्क ३२९ रुपयांवरून ४५९ रुपये आणि मासिक सदस्यता शुल्क १२९ रुपयांवरून १७९ रुपये केले जाईल. ते म्हणाले की, कंपनी सदस्यता शुल्कात बदल करण्याची नेमकी तारीख नंतर जाहीर करेल.

( हे ही वाचा: SSC GD Constable Exam 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा अर्ज फॉर्म स्टेटस जारी )

“पाच वर्षापूर्वी भारतात लॉंच झाल्यापासून, प्राइमने सदस्यांना ऑफर केलेल्या मूल्यामध्ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. प्राईम प्रत्येक दिवसाला जीवन अधिक सोयीस्कर आणि मनोरंजक बनवण्यासाठी खरेदी, बचत आणि मनोरंजनाच्या फायद्यांचे एक अतुलनीय संयोजन प्रदान करते, आणि आम्ही गुंतवणूक करत राहतो ग्राहकांसाठी प्राइम अधिक मौल्यवान बनवण्यासाठी. “प्रवक्त्याने सांगितले.

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या लोकांना कधीही नसते पैशाची कमतरता; स्पर्धेत नेहमी राहतात पुढे )

प्राईम मेंबरशिपचा फायदा काय?

लाखो वस्तूंवर लक्षणीय, तर प्राइम व्हिडीओ १० भाषांमध्ये चित्रपट, टीव्ही शो आणि अमेझॉन ओरिजिनल्समध्ये अमर्यादित अॅक्सेस प्रदान करते. सदस्यांना अॅमेझॉन म्युझिकसह जाहिरातमुक्त ७० दशलक्ष गाण्यांचा प्रवेश, प्राइम रीडिंगसह हजारो पुस्तकांच्या फिरत्या निवडीचा मोफत अॅक्सेस तसेच सेल इव्हेंटमध्ये प्राइमला आधी अॅक्सेस, नवीन उत्पादन लाँच आणि लाइटनिंग डील तसेच अॅक्सेस मिळतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amazons annual prime membership fee to increase by 50 percent learn more details ttg

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या