scorecardresearch

अँपिअर इलेक्ट्रिकने ई-स्कूटर भारतात केली लॉंच, एकाच चार्जवर धावणार १२१ किमी

अँपिअर इलेक्ट्रिककडून मॅग्नस ई-स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये इतकी (एक्स-शोरूम पुणे) आहे.

lifestyle
मॅग्नस ई-स्कूटर एकाच चार्जवर १२१ किमी धावेल. (photo : Ampere electric )

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी लक्षात घेता दुचाकी कंपन्या वेगाने ई-स्कूटरकडे वाटचाल करत आहेत. हेच कारण आहे की भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन वाढत आहे. आता अॅम्पीयर इलेक्ट्रिक कंपनीने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. देशातील रस्त्यांवर ही इलेक्ट्रिक स्कूटर अगदी आरामदायी राईड देईल असा कंपनीचा दावा असून मॅग्नस ई-स्कूटर एकाच चार्जवर १२१ किमी धावेल. कंपनीचे म्हणणे आहे की यात अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

अँपिअर इलेक्ट्रिककडून मॅग्नस ई-स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये इतकी (एक्स-शोरूम पुणे) आहे. लॉंच दरम्यान या कंपनीने सांगितले की नवीन ऑफरची ही किंमत सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी आकर्षक असणार आहे. यातच मॅग्नस तुम्हाला आरामदायक राईडसह देशभरातील लोकांसाठी पसंतीचा पर्याय असणार आहे. मॅग्नस एक्स ही लांब पल्ल्याकरिता वापरकर्त्यांना योग्य फायदेशीर ठरू शकते.

अँपिअर इलेक्ट्रिकच्या मते, ही इलेक्ट्रिक स्कूटर वीज वाचवेल तसेच इंधनाची चिंता दूर करेल. मॅग्नस एक्स ही घर, कार्यालय किंवा कोणत्याही प्लग-ऑन-वॉल चार्ज पॉईंटवर कोणत्याही पाच-अँप सॉकेटमध्ये सहजपणे चार्ज केली जाऊ शकते. यात फास्ट चार्जिंगसह पोर्टेबल प्रगत लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.

अँपिअरने त्यांच्या निवेदनात संगितले आहे की, नवीन मॅग्नस एक्स ही ई-स्कूटर एकाच चार्जवर तीन दिवस चालवू शकतात. जे जास्तीत जास्त ५३ किमी प्रतितास वेग देईल. यामध्ये तुम्हाला १,२०० वॅटची मोटर देण्यात आलीय, जी सर्वोच्च मोटर पॉवरपैकी एक आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, इलेक्ट्रिक वाहने इंधन आणि पैसे वाचवण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक स्कूटरकडे आकर्षित होत आहेत. हे पाहता, अलीकडे Ola, Bajaj, TVS, Hero सारख्या कंपन्यांनी बाजारात स्वतःचे इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ampere electric launches e scooter which will run 121 km on a single charge scsm

ताज्या बातम्या