Angarki Chaturthi Wishes In Marathi : वर्षातून साधारणतः दोनदा येणारा ‘अंगारकी चतुर्थी’चा योग आज ५ मे रोजी जुळून आला आहे. शास्त्रांनुसार, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास पूर्ण वर्षाच्या २१ संकष्टी चतुर्थींचे फळ प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. वैशाख महिन्यात आलेली ही अंगारकी भाविकांच्या जीवनातील विघ्न दूर करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. पहाटेपासूनच सिद्धिविनायक, दगडूशेट हलवाई यांसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये ‘ओम गं गणपतये नमः’चा जयघोष घुमत असून भाविक मोठ्या उत्साहाने दर्शनासाठी रांगा लावत आहेत. दरम्यान या अत्यंत शुभ दिवशी तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि कुटुंबियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा पाठवू शकता.

अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा २०२६

“ऋद्धी-सिद्धीच्या दात्या, विघ्नहर्त्या गणरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!”

“अंगारकीचा हा शुभ योग तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण करो आणि सुखाचे दिवस घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”

“ॐ गं गणपतये नमः! आजच्या या पावन दिवशी बाप्पाकडे एकच मागणी, सर्वांना सुख आणि उत्तम आरोग्य लाभो. अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा!”

“माझा लाडका बाप्पा येणार, दुःख कष्ट दूर नेणार… अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने सर्व मंगल होवो, हीच प्रार्थना. शुभ अंगारकी!”

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ||
गणपती बाप्पा मोरया

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!