उन्हाळ्यात घाम येण्याची समस्या सामान्य आहे. घाम प्रत्येकाला येतो पण जास्त घाम येणे ही देखील समस्या असू शकते. त्याचबरोबर अनेकांच्या चेहऱ्यावर खूप घाम येतो. त्यामुळे अनेकजण हैराण आहे. चेहऱ्यावर जास्त घाम आल्याने त्वचेवरही वाईट परिणाम होतो. तथापि, घाम येणे ही एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक घामाने बाहेर पडतात. पण चेहऱ्यावर जास्त घाम येत असल्याने पिंपल्स सारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर जास्त घाम येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यावर घाम का येतो?

घाम येणे सामान्य असले तरी चेहऱ्यावर घाम येणे ही एक गंभीर समस्या असू शकते. क्रॅनिओफेशियल हायपरहाइड्रोसिसमुळे चेहऱ्यावर जास्त घाम येतो. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. उदाहरणार्थ, हवामानातील बदल, ताणतणाव, जास्त प्रमाणात काही औषधे घेणे, धुम्रपान, जास्त घामाच्या ग्रंथी. तसेच काही आजारांमुळे देखील तुम्हाला खूप घाम येतो, जसे की लठ्ठपणा, संसर्ग, कमी रक्तातील साखर, थायरॉईड इ.

anushka sharma return to India with son akaay kohli and daughter vamika
अखेर वामिका अन् अकायसह भारतात परतली अनुष्का शर्मा, पापाराझींना दाखवली लेकाची झलक
Dr. Babasaheb Ambedkar, London School of Economics
रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
tips to reduce excessive sweat
उन्हामुळे नेहमीपेक्षा जास्त घाम येतोय का? उन्हाळ्यातील हा त्रास कमी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ ४ सोप्या टिप्स

ग्रीन टी, ब्लॅक टी की मिल्क टी? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणता चहा उपयुक्त

चेहऱ्यावर येणार घाम टाळण्याचे उपाय

  • चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर खूप गरम ठिकाणी जाणे टाळावे.
  • चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावा. याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र बंद होतील आणि तुम्हाला कमी घाम येईल.
  • चेहऱ्यावर जास्त घाम येण्याची समस्या काही लोकांमध्ये मानसिक समस्यांमुळेही असते. हे टाळण्यासाठी तुम्ही रोज योग किंवा ध्यान करावे.
  • चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर पुरेसे पाणी प्यावे, असे केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)