एक साधा च्युईंग गम कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचे निदान करू शकतो का? हा प्रश्न एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील कल्पनेसारखा वाटू शकतो; पण शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात एक ‘बायोइंजिनियर्ड च्युईंग गम’ विकसित केला आहे, जो तोंडाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो. तोंडाचा कर्करोग किंवा ओरल कॅन्सर हा अनेकदा तेव्हाच लक्षात येतो, जेव्हा हा आजार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. शास्त्रज्ञांनी एक कर्करोगविरोधी च्युईंग गम तयार केला आहे, जो तोंडाच्या कर्करोगाला हरवण्यास सक्षम आहे.

हेन्री डॅनिएल यांच्या नेतृत्वाखाली, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनमधील संशोधकांनी असे शोधून काढले आहे की, जैवअभियांत्रिकीने तयार केलेल्या च्युईंग गममधील अर्क डोके आणि मानेच्या कर्करोगाशी (HNSCC) संबंधित असलेल्या तीन सूक्ष्मजंतूंची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’मध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास, एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या उपचाराचा पर्याय सादर करतो.

तोंडाचा कर्करोग

एचएनएससीसी (HNSCC) हा तोंड आणि घशाच्या आतील ऊतींमध्ये विकसित होणारा एक सामान्य प्रकारचा कर्करोग आहे. तो अनेकदा आक्रमक असतो आणि उशिरा निदान झाल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. डॅनियल यांच्या मते, अलीकडेच मंजूर झालेल्या अनेक कर्करोगाच्या औषधांमुळे जीवनमानात किंवा पाच वर्षांच्या जगण्याच्या दरात लक्षणीय सुधारणा झालेली नाही, ज्यामुळे नवीन उपचारांची गरज आणखी वाढली आहे.

प्रयोगशाळेत तयार केलेला विशेष बीन्स च्युईंग गम

पेन डेंटलच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेला एक जैव-अभियांत्रिकी बीन गम, तोंडातील फायदेशीर जीवाणूंना कोणतीही हानी न पोहोचवता, कर्करोगाशी संबंधित तीन सूक्ष्मजंतूंची पातळी जवळजवळ शून्यावर आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा गम लॅबलॅब बीन्सपासून बनवला जातो, ज्यामध्ये फ्रिल (FRIL) नावाचे प्रथिन असते.

संशोधकांनी एचएनएससीसी रुग्णांच्या तोंडाच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आणि तीन सूक्ष्मजीवांची पातळी मोजली.

  • मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV)
  • पोर्फिरोमोनास जिंजिव्हॅलिस (Pg)
  • फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम (Fn)

गम थेरपीमुळे धोकादायक सूक्ष्मजंतूंमध्ये घट दिसून येते.

डॅनियल स्पष्ट करतात की, जगभरात वाढणाऱ्या मुख वा घशाच्या कर्करोगाचे (ओरोफॅरिंजियल कॅन्सर) प्रमुख कारण एचपीव्ही (HPV) संसर्ग आहे. पीजी (Pg) आणि एफएन (Fn) जीवाणूंचे संक्रमण, तसेच उपचार न केलेला किंवा पुन्हा उदभवणारा तोंडाचा कर्करोग, शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार करूनही रुग्णाच्या जगण्याची शक्यता कमी करतात.

संशोधनातून असे दिसून आले आहे की बीन गमच्या अर्काने लाळेतील एचपीव्हीची पातळी ९३% ने कमी केली. माऊथ रिन्सच्या नमुन्यांमधील एचपीव्हीची पातळी ८०% ने कमी झाली. इतकेच नव्हे, तर जेव्हा प्रोटिग्रिन, एक प्रतिजैविक पेप्टाइड, त्यात मिसळले गेले, तेव्हा पीजी आणि एफएनची पातळी जवळजवळ शून्यावर आली; तर तोंडातील चांगले जीवाणू अबाधित राहिले. ही पद्धत रेडिएशन थेरपीपेक्षा वेगळी आहे. कारण- रेडिएशनमुळे चांगले जीवाणूदेखील मरतात आणि हानिकारक यीस्ट (कँडिडा) वाढू शकते.

हा शोध का महत्त्वाचा

२०२२ मध्ये जगभरातील किशोरवयीन, तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये ओठ आणि तोंडाचा कर्करोग हा कर्करोगाची प्रकरणे आणि मृत्यूचे सातवे प्रमुख कारण होते. डॅनियलच्या मते, हा च्युईंग गम तोंडाचा कर्करोग टाळण्यास मदत करू शकतो.

संशोधनाचा निकाल काय होता?

वैद्यकीय चाचण्यांमध्ये अधिक तपासाच्या दृष्टीने सध्याच्या उपचारांसोबत एक पूरक उपचार म्हणून ‘या’ प्रकारच्या हिरड्यांच्या उपचारांचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच संसर्ग आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही ‘हे’ उपचार उपयुक्त ठरू शकतत.