आता कर्करोगाशी लढणे शक्य

‘सायन्स इम्युनोलॉजी’ या नियतकालिकेत संशोधन प्रसिद्ध

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सायन्स इम्युनोलॉजीया नियतकालिकेत संशोधन प्रसिद्ध

संशोधकांनी अशा अँटिबॉडी शोधल्या आहेत, ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होऊन विविध प्रकारचे कर्करोग आणि गाठींची होणारी वाढ रोखण्यास मदत होते. इम्युनोथेरपीसाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे संशोधकांनी सांगितले.

अमेरिकेतील ब्रिगम अ‍ॅण्ड वुमन रुग्णालयातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. ‘सायन्स इम्युनोलॉजी’ या नियतकालिकामध्ये याबाबतचे नवीन संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हानिकारक बाहय़ पदार्थ शरीरात शिरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याकरिता शरीरात जो विशिष्ट प्रतिरक्षात्मक (प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याचा) प्रतिसाद मिळतो, त्यामध्ये रक्तद्रवात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना प्रतिपिंड अर्थात अँटिबॉडी असे म्हणतात.

अँटिबॉडी या सातत्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे वाढलेली शक्ती कर्करोगच्या पेशी नष्ट करण्यास मदत करीत असल्याचे यामध्ये दिसून आले. प्रतिजनाविरुद्ध (अँटिजन) त्याची निर्मिती झाली असेल तर त्याच्याशीच संयोग पावून त्याची हानिकारकता घालविणे हा अँटिबॉडीचा विशिष्ट गुणधर्म आहे.

अँटिबॉडीमुळे प्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्यामुळे त्वचा, मेंदू आणि कोलनसह इतर अनेक कर्करोग कमी होत असल्याचे संशोधकांना अभ्यासात आढळून आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Antibody can help kill cancer cells

ताज्या बातम्या