Apple ची सेल्फ रिपेअर योजना; आता स्पेअर पार्ट्स खरेदी करून दुरूस्त करा आयफोन

सेल्फ-रिपेअर प्रोग्राम अंतर्गत तुम्ही आता मूळ अ‍ॅपलचे स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकाल.

applelogo_800
Apple ची सेल्फ रिपेअर योजना; आता स्पेअर पार्ट्स खरेदी करून दुरूस्त करा आयफोन (Photo- Indian Express)

सर्वात महागडा फोन म्हणून आयफोनची ख्याती आहे. हा फोन वापरणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. मात्र या फोनमध्ये बिघाड झाल्यास अनेकांना दुरुस्तीसाठी अधिकृत सेंटरमध्ये धाव घ्यावी लागते. कधी कधी काही दुरुस्तीसाठी लोकल मार्केटमध्ये दिला जातो. त्यामुळे अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. आता अ‍ॅपलने प्रथमच स्वत: ची दुरुस्ती योजना सुरू केली आहे. सेल्फ-रिपेअर प्रोग्राम अंतर्गत तुम्ही आता मूळ अ‍ॅपलचे स्पेअर पार्ट्स खरेदी करू शकाल आणि तुमचा iPhone किंवा MacBook स्वतःच दुरुस्त करू शकाल. अ‍ॅपलने पहिल्यांदाच सामान्यांसाठी स्पेअर्स उपलब्ध करून दिले आहेत. २०१९ मध्ये, Apple ने प्रथमच असा कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर मोबाईल दुरुस्तीची दुकाने अ‍ॅपलच्या उत्पादनांचे सुटे भाग खरेदी करू शकतात. या कार्यक्रमांतर्गत २,८०० मोबाइल दुरुस्तीची दुकाने जोडली गेली आहेत, तर ५,००० अधिकृत दुरुस्ती केंद्रे आहेत.

आता ग्राहकांना मॅन्युअलच्या मदतीने सुटे भाग खरेदी करणे आणि फोन किंवा लॅपटॉप दुरुस्त करणे देखील शक्य होणार आहे. सुरुवातीला अ‍ॅपल iPhone १२ आणि 13 चे डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेरा दुरुस्त करण्यासाठी २०० भाग आणि टूल्ससह उपलब्ध करून देतील. मॅक वापरकर्त्यांनाही या कार्यक्रमाचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमांतर्गत, ग्राहकांना कोणत्याही मोबाइल दुरुस्तीच्या दुकानाप्रमाणेच सुटे भाग मिळतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने भाग अ‍ॅपलला परत करून तुम्ही काही सूट देखील घेऊ शकता. पुढील वर्षीच्या सुरुवातीला हा उपक्रम सुरू होणार आहे.

देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत २३४ टक्क्यांची वाढ, टॉप ५ मध्ये टाटाच्या दोन गाड्या

आयफोन लवकरच एक नवीन अपडेट जारी करणार आहे. ज्यानंतर आयफोन 13 मालिकेतील कोणत्याही फोनचा डिस्प्ले थर्ड पार्टी स्टोअरमधून बदलल्यास फेस आयडी कार्य करण्यास सुरवात करेल. सध्या, iPhone१३ मालिकेचा डिस्प्ले बदलताना किंवा नवीन डिस्प्ले स्थापित करताना फेस आयडी काम करत नव्हता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple introduce self repair scheme for iphone and mcbook rmt

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या