Apple २०२१ च्या कार्यक्रमात मॅकबुक प्रो, एअरपॉड्स थर्ड जनरेशन केले लॉंच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमती

अॅपलने नवीन मॅकबुक प्रो २०२१ चे अनावरण केले आहे.

lifestyle
दोन्ही लॅपटॉप अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवरून मागवले जाऊ शकतात (photo: indian express)

अॅपलने सोमवारी अॅपल २०२१ च्या कार्यक्रमात अनेक नवीन उत्पादनांची घोषणा केली. त्यापैकी विशेषतः नवीन मॅकबुक प्रो लॅपटॉप जे बीफियर एम १ प्रो आणि एम १ मॅक्स प्रोसेसर आणि अपडेटेड डिझाइनसह आले आहेत. याशिवाय कंपनीने नवीन एअरपॉड्स, नवीन स्पीकर्स आणि अॅपल म्युझिकची नवीन योजना सादर केली आहे. यासह, कंपनीने नवीन प्रोसेसरपासून पडदाही उठवला आहे. या उत्पादनांबद्दल जाणून घेऊयात

मॅकबुक प्रो २०२१ किंमत आणि वैशिष्ट्ये

अॅपलने नवीन मॅकबुक प्रो २०२१ चे अनावरण केले आहे. जे १४-इंच आणि १६-इंच अशा दोन स्क्रीन मध्ये तुम्हाला घेता येणार आहे. तसेच कंपनीने दोन्ही मॅकबूक प्रो ची प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केली आहेत. हे दोन्ही लॅपटॉप अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवरून मागवले जाऊ शकतात आणि त्यांची विक्री २६ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर १४-इंच मॅकबुक प्रो ५१२ जिबी (GB) ची किंमत १,९४,९०० इतकी रुपये आहे, तर M1 Pro 1TB वर्जनची किंमत २,३९,९०० रुपये इतकी आहे. तर १६-इंच मॅकबुक प्रो ची किंमत भारतात M1 Pro ५१२ जिबीसाठी २,३९,९०० रुपये आहे, तर १६-इंच M1 Pro 1TB ची किंमत २,५९,९०० रुपये इतकी असून M1 Max 1TB या वर्जनची किंमत ३,२९,९०० रुपये इतकी आहे.

अॅकबुक प्रो २०२१ लॅपटॉपमध्ये सुधारित सेकंड जनरेशन अॅपल सिलिकॉम प्रोसेसर सपोर्टसह लॉंच करण्यात आला आहे. हा लॅपटॉप पॉवरफूल CPU परफॉर्मेंस मिळेल. हा लॅपटॉप १० सीपीयू कोर आणि ट्विन ग्राफिक्स परफॉर्मेंससह तुम्हाला मिळणार आहे. १६ जीपीयू कोर आणि ६४ जिबी रॅमच्या सपोर्टसह सादर केले गेले आहेत. हा चिपसेट ६४ जिबी (GB) रॅम सपोर्टसह येतो. लॅपटॉपला SSDs सपोर्टसह ७Gbps स्पीड देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये लिक्विड रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सपोर्ट आहे, जो मिनी एलईडी टेक्नॉलॉजी सपोर्टसह येईल. नवीन मॅकबुक प्रोच्या दोन्ही आवृत्त्या ६ स्पीकर ध्वनीसह येत असून जे डॉल्बी एटमॉस सक्षम अवकाशीय ऑडिओ सपोर्टसह येत आहे.

एअरपॉड्स (थर्ड जनरेशन) किंमत आणि वैशिष्ट्ये

अॅपलने सोमवारी एअरपॉड्स (थर्ड जनरेशन) लाँच केले आहे. यात AAC-ELD codec आणि हाय-रेंज एम्पलीफायर आहे. यात दमदार बॅटरी देण्यात आली आहे. अॅपल एअरपॉड्स (3rd Generation) ची रचना एअरपॉड्स प्रो सारखीच आहे. यात प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फोर्स सेन्सरचा आधार देण्यात आली आहे. याशिवाय, सिरी व्हॉईस असिस्टंटचे वैशिष्ट्य एअरपॉड्स 3 मध्ये देखील उपलब्ध आहे. त्याच वेळी हे नवीन इयरबड डॉल्बी एटमॉस, कस्टम ड्रायव्हर्स आणि हाय-रेंज एम्पलीफायरसह सुसज्ज करण्यात आले आहेत, अॅपल एअरपॉड्स (3rd Generation) ची किंमत १८,५०० रुपये इतकी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple launches new product macbook pro airpods 3rd gen learn features and prices scsm

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या