स्ट्रॉबेरी दिसायला जितकी सुंदर तितकीच चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आंबट-गोड स्ट्रॉबेरी हे असे फळ आहे जे लहान मुलांपासून ते वृद्धांना सगळ्यांना खूप आवडते. व्हिटॅमिन सी समृद्ध स्ट्रॉबेरी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, तसेच अनेक रोगांवर उपचार करते.

त्यात स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच ती त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुम्हाला चमकदार चेहरा हवा असेल तर स्ट्रॉबेरीचा वापर करा. स्ट्रॉबेरी हे त्वचेसाठी एक सुपरफूड आहे जे निर्जीव आणि निस्तेज चेहऱ्यावर चमक आणते.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेली स्ट्रॉबेरी, त्वचेची जळजळ दूर करते, तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. त्याचा वापर केल्याने वृद्धत्वाचा प्रभाव कमी दिसून येतो. स्ट्रॉबेरीमध्ये अल्फा-हायड्रॉक्सीलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते जे त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यास मदत करते. स्ट्रॉबेरी मुरुमांवर सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. विशेष म्हणजे घरच्या घरी स्ट्रॉबेरीचे विविध फेसपॅक तयार करू शकतो. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम मास्क कसा तयार करायचा जाणून घ्या.

साहित्य:

स्ट्रॉबेरी प्युरी, दही किंवा फ्रेश क्रीम, मध

स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम मास्क बनवण्यासाठी प्रथम एका वाटीत स्ट्रॉबेरी प्युरी घ्या. तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर फ्रेश क्रीम वापरा. जर त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी सोबत दही वापरा. आता तुमच्या त्वचेनुसार दही किंवा फ्रेश क्रीम घ्या आणि नीट मिसळा आणि तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक मुरुमांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

चेहऱ्याची टॅनिंग दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा फेस पॅक

जर तुमच्या त्वचेवर टॅनिंग आणि पिगमेंटेशनच्या खुणा असतील तर तुम्ही स्ट्रॉबेरी आणि कडुलिंबाचा पॅक नक्कीच वापरावा. ते बनवण्यासाठी तुम्हाला एका वाटीत स्ट्रॉबेरी पेस्ट आणि एक चमचा लिंबाचा रस चांगले पद्धतीने मिसळवा आणि नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

स्ट्रॉबेरी आणि हनी फेस मास्क

मध हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेतील अशुद्धता काढून टाकते आणि मुरुमांवर उपचार करते. हा फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम काही स्ट्रॉबेरी मॅश करून त्याची पेस्ट बनवा. यानंतर त्यात एक चमचा मध घालून चांगले मिसळा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तशीच राहू द्या. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.