कर्जमुक्ती आणि संपत्ती वाढवण्यासाठी मंगळवारी ‘हे’ उपाय करण्याची आहे मान्यता

मंगळवारी ऋण मोचन अंगारक स्तोत्राचे पठण केल्याने ऋण मुक्त होते असे मानले जाते.

lifestyle
हनुमान यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा मातीचा दिवा लावावा. (photo: jansatta)

हिंदू धर्मात मंगळवार हा हनुमानाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हणतात. या दिवशी श्री रामभक्त हनुमानजींच्या मंदिरात भाविकांची वर्दळ असते. बजरंगबलीची पूजा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात, असे मानले जाते. जाणून घ्या हनुमानजींची विशेष कृपा मिळविण्यासाठी मंगळवारी कोणते उपाय केले जातात.

उपाय

या दिवशी हनुमानजी यांच्या समोर मोहरीच्या तेलाचा मातीचा दिवा लावावा. हनुमान चालिसा वाचा. गरजूंना आवश्यक वस्तू दान करा. हा उपाय केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते.

मंगळवारी कर्जमुक्तीसाठी ओम हनुमंते नमः मंत्राचा जप सकाळी १०८ वेळा करावा. तुम्ही मंगळवारीही उपवास करू शकता. असे केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.

मंगळवारी ऋण मोचन अंगारक स्तोत्राचे पठण केल्याने ऋण मुक्त होते असे मानले जाते. तसेच मानले जाते की मंगळवारी सुंदरकांड पठण केल्याने सर्व त्रास दूर होतात.

मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर गायीला भाकरी खाऊ घातल्यास लक्ष्मी देवीची विशेष कृपा होते असे मानले जाते.

सुख-समृद्धीसाठी या दिवशी देवीच्या मंदिरात ध्वज चढवावा, असे मानले जाते. मंगळवारी ११ पीपळाची पाने घ्या, जेणेकरून जीवनात पैशाची कमतरता भासू नये, स्वच्छ पाण्याने धुवून पानांवर चंदनाने श्रीराम लिहा. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात ही पाने अर्पण करा. असे केल्याने आर्थिक संकट दूर होते असे मानले जाते.

या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिव्यात काही काळ्या उडदाच्या बिया टाका. हे काम संध्याकाळी करा. असे केल्याने सर्व कामे पूर्ण होतात असा समज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Approval is to be taken on tuesday to increase debt relief and wealth scsm

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या