How to differentiate muscle pain from nerve pain : बऱ्याचदा, जेव्हा आपल्याला शरीराच्या कोणत्याही भागात वेदना जाणवतात. तेव्हा आपण त्याला साधा थकवा किंवा स्नायूंचा ताण समजून दुर्लक्ष करतो किंवा दुखणं कमी होण्यासाठी औषध घेऊन मोकळे होतो. पण तुम्हाला माहित आहे का? की सर्व प्रकारच्या वेदना सारख्या नसतात? स्नायूदुखी आणि नसदुखीची कारणे आणि उपचार पद्धतीसुद्धा पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर वेदनेचे योग्य निदान झाले नाही तर चुकीच्या उपचारामुळे समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

जयपी हॉस्पिटल नोएडा, एसपीईएस हॉस्पिटल ग्रेटर नोएडा आणि बोन हॉस्पिटल आग्रा येथे सल्लागार म्हणून कार्यरत असलेले प्रख्यात स्पाइन सर्जन डॉक्टर देवाशीष शर्मा म्हणाले की, कधीकधी शरीरातील वेदना सारख्याच वाटतात पण त्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. वैद्यकीय भाषेत स्नायूंच्या वेदनेला ‘मायल्जिया’ (Myalgia) म्हणतात, तर नसांच्या वेदनेला ‘न्यूराल्जिया’ (Neuralgia) म्हणून ओळखले जाते. लोक सहसा स्नायूंची वेदना आणि नसांची वेदना एकच मानतात. पण, या दोन्हींचे स्वरूप, लक्षणे आणि कारणे पूर्णपणे भिन्न आहेत.

नसांचं दुखणं आणि स्नायूंचं दुखणं; फरक आणि कारणे

स्नायूदुखी कशी जाणवते?

स्नायूदुखी सामान्यतः एकाच ठिकाणी जाणवते. ज्या भागाला दुखापत झाली त्या भागात वेदना होतात. जड काम करताना किंवा वजन उचलताना ही वेदना अधिक वाढते. स्नायूदुखी दुखापतीमुळे होऊ शकते. पण, वारंवार हालचाल केल्याने स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात किंवा थकवा येऊ शकतो. या प्रकारची वेदना सामान्यतः विश्रांतीने कमी होते आणि तिचे कारण ओळखणे सोपे असते.

Award Banner

नसांची वेदना कशी जाणवते?

न्यूराल्जिया हा वेदनेचा एक पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. ही वेदना तीव्र असते आणि एका भागातून दुसऱ्या भागात पसरते. उदाहरणार्थ, सायटिकामध्ये, वेदना कमरेत सुरू होऊन मांडी, पोटरी आणि घोट्यापर्यंत पसरू शकतात. या वेदनेसोबत मुंग्या येणे अशा गोष्टी जाणवू शकतात. एका भागातून दुसऱ्या भागात पसरणारी वेदना ही नसांच्या वेदनेची लक्षणे असू शकतात.

नसांचं दुखणं कशामुळे उद्भवतं?

जेव्हा नसांवर दबाव येतो किंवा नस योग्य प्रकारे काम करत नाही. तेव्हा नसांमध्ये वेदना जाणवतात आणि या वेदना स्लिप डिस्कमुळे, मधुमेही न्युरोपॅथी आणि नसांचे बिघडलेले कार्य, या सर्वांमुळे होऊ शकतात.

मसल पेननर्व पेन
एकाच जागेत सीमितनस ज्या मार्गाने जात आहे त्या संपूर्ण भागात वेदना होऊ शकते.
जखम, जागेचा जास्त वापर, थकवानस दाबली जाणे, जखम
आरामाने किंवा हलक्या स्ट्रेचिंगने बरे होऊ शकतेहालचाल केल्यावर किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्यावर वेदना वाढू शकतात
सुन्नपन किंवा जळजळ होत नाहीसुन्नपणा किंवा करंटसारखी जळजळ होऊ शकते

उपचार कसा करावा?

स्नायूंच्या वेदना कमी करायच्या असतील, तर विश्रांती घ्या. दुखणाऱ्या भागावर शेक द्या. वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर मूत्रपिंड आणि यकृतासाठी हानिकारक ठरू शकतो, म्हणून ती घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता हे नसांच्या वेदनांचे एक सामान्य कारण आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी, आपल्या आहारात व्हिटॅमिन बी१२ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन बी१२ सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.