भूक सहन करणं हे कठीण तर असतंच पण तितकंच चुकीचं देखील असतं. मात्र, वजन कमी करण्यासाठी विशिष्ट डाएट फॉलो करायला सुरुवात होते तेव्हा ते आणखीच आव्हानात्मक बनतं. मग खूप वेळा अनेक जण जंक फूडचा पर्याय निवडतात. परंतु, अगदीच डाएट कॉन्शियस असणारी लोकं अशा तीव्र भुकेच्या वेळी सूप आणि सॅलडला पसंती देतात. कारण, हे पर्याय आरोग्यदायी असल्याचं म्हटलं जातं. परंतु, खरंच हे पर्याय नेहमीच योग्य ठरतात का? तज्ञांच्या मते, सूप आणि सॅलड हे पर्याय नेहमीच हेल्थी ठरत नसतात. हे कधी उपयुक्त ठरू शकतात? कधी त्यांचं सेवन करावं आणि कधी टाळावं? याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत

न्यूट्रिशनिस्ट सौम्या बी हेगडे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं कि, “मी दिवसभरातील प्रमुख जेवणाच्या वेळांमध्ये सूप किंवा सॅलड घेण्याची शिफारस करत नाही. कारण तो संतुलित आहार नाही. केवळ ब्रेकफास्ट किंवा रात्रीच्या जेवणासाठी हे पर्याय योग्य ठरतात. दुपारच्या जेवणामध्ये आपण तांदूळ, गहू, ज्वारी किंवा बाजरी यांसारख्या कार्बोहायड्रेट्सचं सेवन केलं पाहिजे. तसेच त्या पुढे म्हणतात कि, “ज्यांना आपलं वजन लवकर कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे”.

असं बनवा हेल्थी सूप

न्यूट्रिशनिस्ट सौम्या बी हेगडे म्हणतात कि, “तुम्ही मशरूम, ब्रोकोली किंवा मिश्र भाज्यांचं सूप असं हेल्थी सूप बनवू शकता. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हेल्थी सूप बनवण्याचं असेल तर त्यात साखर, मध, कॉर्न किंवा बटर घालणं टाळा. कारण, अर्थात त्यामध्ये भरपूर कॅलरीज आहेत. त्याचप्रमाणे, मेयोनिझसारख्या टॉपिंग्समुळे देखील फक्त अतिरिक्त कॅलरीज मिळतात. त्यामुळे सॅलडचा मुख्य उद्देश बाजूला राहतो.”

सौम्या हेगडे म्हणाल्या कि, “तुमच्या सॅलडमध्ये चवीसाठी लिंबाचा रस आणि मीठ घालण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही तुमच्या सॅलड्मध्ये तव्यावर परतलेले पनीर, टोफू किंवा सोया चंक्स देखील टाकू शकता.”त्याचप्रमाणे, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर दररोज तुम्हाला शरीराच्या आवश्यकतेनुसार कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि भाज्या याचं सेवन करायलाच हवं.

सूप आणि सॅलडचं योग्य कॉम्बिनेशन 

फूड, लाइफस्टाईल आणि वेलनेस एक्सपर्ट डॉ.सिद्धांत भार्गव आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात कि, “योग्य आहार नियंत्रणात ठेवणं अवघड आहे आणि आपल्या आरोग्यासाठी कोणता पदार्थ १०० टक्के हेल्थी असू शकतो हे समजून घेणं आणखीच आवघड आहे. जाणून घेऊया कि तुम्ही सूप आणि सलॅड योग्य कॉम्बिनेशन कसं करू शकता. त्याचबरोबर डॉ.सिद्धांत पुढे असंही म्हणतात कि, “सूप आणि सॅलडमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. मात्र, जोपर्यंत ते योग्य प्रमाणात आणि पद्धतीने खाल्लं गेलं नाही तर हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरू शकत नाही.”

सूप आणि सॅलड बनवण्यासाठी सोप्या टिप्स, डॉ. भार्गव म्हणतात

  • सूप आणि सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या या ताज्याच असाव्यात. त्या भाज्या कापल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही त्यांचं सेवन करावं.
  • तुमच्या सॅलडमध्ये नेहमी प्रथिनांचा समावेश असलाच पाहिजे.(उदा. बीन्स, डाळी, टोफू, पनीर, अंडी, चिकन फिश)
  • त्यात सुपर हेल्थी फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. (ड्रायफ्रूट्स, सीड्स)
  • तुम्ही तुमच्या सॅलड-सूपवर ज्या पदार्थाने गार्निश कराल तो पदार्थ पॅकेज्ड नसावा.
  • तुमच्या सूपमध्ये साखर नव्हे तर भरपूर भाज्या असाव्यात.
  • सूपमध्ये कॉर्न स्टार्च घालू नका.