How To Consume Basil : तुळस, ज्याला Holy Basil म्हणूनही ओळखले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्त्व आहे. जिथे सनातन धर्मात तिला देवीची उपाधी मिळाली आहे तिथे तिला आयुर्वेदात ‘औषधींची राणी’ असेही म्हणतात.
भारतीय घरांमध्ये पुजनीय मानली जाते. पण तुळशी फक्त पुजेसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये तूळशीचे अनेक फायदे सांगितले आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून पोटांचे आरोग्य जपण्यापर्यंत तूळशीचे अनेक फायदे आहेत. पण कित्येक लोक जे तुळशीचे पाने चावून खातात. पण ही सवय खरंच योग्य आहे का?
तुम्ही तुळशीची पाने चावून खाऊ शकता का? (Can you chew basil leaves and eat them?)
अनेकदा लोक तुळशीची पाने चावून खातात, पण तुम्हाला माहित आहे का की यामुळे तुमच्या दातांचे किती नुकसान होऊ शकते? तुळशीमध्ये पारा असतो, जो केवळ दातांना नुकसान पोहोचवत नाही, तर त्यांचा रंगही बदलू शकतो आणि दात झिजवू शकतो. जर तुम्हाला तुमचे दात मजबूत ठेवायचे असतील, तर तुळस चावणे थांबवा.
तुम्ही तुळशीची पाने चहामध्ये घालून सेवन करू शकता (You can consume basil leaves by adding them to tea)
- तूळशीच्या पानांची पूड : तुम्ही तुळशीच्या पानांची पूड करून ती एका ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
- तुळशीची पाने पाण्याबरोबर गिळा : सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यासोबत २ ते ३ पाने गिळता येतात.
- तुळशीचा चहा किंवा काढा : तुळस उकळून पिणे चांगले, कारण कच्ची पाने जास्त चावल्याने कधीकधी दातांना इजा होऊ शकते.
जास्त तुळस खाण्याचे दुष्परिणाम? (Side effects of eating too much basil)
- जळजळ : तुळस उष्ण असल्यामुळे, तिचे जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते.
- रक्त पातळ होणे : जास्त तुळशीची पाने खाल्ल्याने रक्त पातळ होऊ शकते.
- रक्तदाब : मधुमेहाच्या रुग्णांनी तुळशीची पाने खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
(डॉ. राम अवतार हे दिल्ली सरकारच्या योग विभागातील सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांना योग आणि ध्यान क्षेत्रात ३८ वर्षांपेक्षा जास्त काळाचा प्रदीर्घ आणि व्यावहारिक अनुभव आहे. त्यांनी योग, प्राणायाम, ध्यान, नाडी शास्त्र, वनौषधी/पारंपरिक औषधोपचार, निसर्गोपचार, रेकी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून अनेक गुंतागुंतीच्या आणि असाध्य रोगांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. )
