Sabudana Benefits: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे लाखो भक्त पूजा-आराधनेसह व्रतदेखील करतात. उपवासाच्या दिवशी साबुदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याला आरोग्यदायी अन्नदेखील म्हटले आहे. पण, तुम्ही उपवासाला खात असलेला साबुदाणा आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?
साबुदाणा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
टॅपिओका (Tapioca) म्हणजेच साबुदाणा होय, जो कसावा (Cassava) वनस्पतीच्या कंदमुळांपासून काढलेल्या स्टार्चपासून बनतो. या वनस्पतीला सागो असेही म्हणतात. सागो हे रताळ्यासारखे दिसणारे कंदमूळ आहे. ब्राझील, अमेरिका, आशिया शिवाय जगभरात अनेक देशांमध्ये सागोचा वापर केला जातो. युरोपमधील काही भागांमध्ये याला कासावा नावाने ओळखले जाते, तर जगभरात त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
साबुदाणा खाण्याचे फायदे
ऊर्जेचा चांगला स्रोत
साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते, म्हणूनच उपवासाच्या वेळी ते खाण्यास हलके असल्याने ते एक चांगला पर्याय मानले जाते.
ग्लूटेन-मुक्त
जे लोक ग्लूटेन-मुक्त अन्न खातात आणि ज्यांना ग्लूटेनची ॲलर्जी आहे, ते देखील साबुदाणा खाऊ शकतात.
पचायला सोपा
साबुदाणा खाण्यास हलका असतो आणि त्यामुळे तो पचायला सोपा असतो आणि लवकर पचतो.
साबुदाणा खाण्याचे तोटे
कार्बोहायड्रेट्स जास्त, पोषक तत्वे कमी
साबुदाणा हा स्टार्चपासून बनवला जातो, त्यामुळे त्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते, परंतु प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात; त्यामुळे ते बराच काळ भूक लागू देत नाही.
रक्तातील साखर वाढू शकते
मधुमेह असलेल्यांसाठी साबुदाणा मर्यादित प्रमाणात खाणे चांगले मानले जाते, कारण त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो.
वजन वाढणे
जर साबुदाणा जास्त प्रमाणात किंवा तळून खाल्ला तर त्यामुळे वजन वाढू शकते.
निरोगी साबुदाणा कसा बनवायचा?
साबुदाणा पूर्णपणे भिजवून उकळा. एका पॅनमध्ये थोडे तेल घाला, त्यात बटाटा, जिरे, मिरची, शेंगदाणे घाला आणि मिक्स करा; यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढेल. चवीनुसार मीठ घाला आणि साबुदाण्याचा आस्वाद घ्या. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास साबुदाणा आरोग्यदायी ठरू शकतो.

