Do Not Eat These Food: हल्लीची बदलती जीवनशैली पाहता, जसजसे आपले वय वाढते, तसतसे आपले शरीर वेगवेगळ्या पदार्थांवर वेगवेगळी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करते. तरुणपणी तुम्हाला आवडणारे अनेक पदार्थ चाळिशीनंतर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. ते पोटावरील चरबी, हृदयाचे आरोग्य, इन्सुलिन संवेदनशीलतेचे नुकसान आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. त्यामुळे चाळिशीनंतर हे पदार्थ आपल्या आहारातून काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वयाच्या चाळिशीनंतर ‘हे’ पदार्थ टाळा

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस चवीला स्वादिष्ट वाटू शकते; पण त्यामुळे आरोग्याच्या समस्या लवकर उदभवू शकतात. प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सोडियम, सॅच्युरेटेड फॅट्स व नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान करतात. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या मांसाव्यतिरिक्त तुम्ही चिकन आणि चरबीयुक्त मासे खाऊ शकता.

साखरयुक्त पेये

साखरयुक्त पेये तुमच्या आरोग्याला तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके नुकसान पोहोचवतात. साखरयुक्त पेयांमुळे इन्सुलिन स्रवते. जर पेशींनी इन्सुलिनला प्रतिकार केला, तर त्यामुळे अंतर्गत चरबी जमा होते, जी कमी करणे कठीण असते. अशा परिस्थितीत तुम्ही साखरयुक्त पेयांऐवजी स्पार्कलिंग वॉटर, ग्रीन टी व ब्लॅक कॉफी घेऊ शकता.

शुद्ध केलेली कर्बोदके

पांढरा ब्रेड, पेस्ट्री व इन्स्टंट सीरियल्समध्ये रिफाईंड कार्ब्स असतात. जेव्हा ते तुमच्या शरीरात जातात, तेव्हा ते फायबर पुरवत नाहीत, उलट साखर पुरवतात. त्यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते. त्यामुळे या रिफाईंड कार्ब्सपेक्षा स्टील-कट ओट्स आणि क्विनोआसारखे पदार्थ तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.

जास्त – प्रक्रिया केलेले स्नॅक्स

चिप्स आणि कुकीज हे जास्त – प्रक्रिया केलेले पदार्थ मानले जातात. त्यांच्यामुळे दाह होऊ शकतो आणि आतड्यांच्या संरक्षक कवचाला नुकसान पोहोचू शकते. जर तुम्हाला मधल्या वेळेत काही खायचेच असेल, तर फळे किंवा ग्रीक योगर्ट खाऊन बघा.

तळलेले पदार्थ

चाळिशीनंतर तुम्ही विशेषतः तळलेले पदार्थ टाळावेत. तळलेल्या पदार्थांमुळे शरीरातील न्यूरोटॉक्सिन वाढतात. चाळिशीत शरीर आधीच दाह कमी करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तळलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने दाह वाढू शकतो. म्हणूनच तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे महत्त्वाचे आहे.

या पदार्थांचे दुष्परिणाम काय?

  • शरीरात विषारी पदार्थ वाढू लागतात. ज्या गोष्टी वयाच्या तिशीत तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाहीत, त्याच गोष्टी चाळिशीपर्यंत तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात.
  • धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
  • स्नायूंची पुनर्प्राप्ती थांबते.
  • झोपेशी संबंधित समस्या उदभवू लागतात.
  • इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते.
  • शरीरात अंतर्गत चरबी वाढू लागते.
  • हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
  • पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.