High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Health Special
Health Special: उन्हाळ्याची झळ – काय काळजी घ्याल ?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

नवी दिल्ली : उन्हाळय़ात आरोग्याची काळजी घेताना केसांचीही विशेष निगा राखावी लागते. या काळात केस रूक्ष होत असतात. त्यांना मऊ-तलम ठेवणारा शॅम्पू व त्यानंतर कंडिशनर लावावे. मात्र, त्याचा अतिरेक करू नये. आठवडय़ात एक-दोनदा शॅम्पू लावावा. स्नानानंतर केसांना ‘सिरम’ लावावे. या काळात आपली केशरचना नैसर्गिक शैलीनुसार ठेवावी. गुंतागुंतीची केशरचना करू नये. आठवडय़ातून एकदा ‘हेअर मास्क’ लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

स्ट्रॉबेरी, अक्रोड, केळी, लाल ढोबळी मिरची, टोमॅटो, मसूर, आंबाडी आणि हिबिस्कस चहा हे उन्हाळय़ात केस आणि त्वचेचे सौंदर्य राखणारे पदार्थ आहेत. त्यांच्यात अ आणि क जीवनसत्त्वे असतात. त्यासह यात झिंकची मात्रा असल्याने केसांची निगा राखली जाते. या काळात प्रखर उन्हामुळे केसांवर दुष्परिणाम होत असतात. सतत येणारा घाम, त्यावर बसणारी धूळ-प्रदूषणामुळे केस सातत्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. केसांचा थेट उन्हाशी संपर्क येऊ देऊ नये. ते झाकण्यासाठी रुमाल किंवा टोपी वापरावी. या काळात आपण पोहणे पसंत करतो. जलतरण तलावातील पाणी र्निजतुक करण्यासाठी, क्लोरिन अधिक वापरतात. हे क्लोरिनयुक्त पाणी केसांना अपायकारक ठरत असल्याने त्याचा केसांशी थेट संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी ‘स्विमिंग कॅप’ वापरावी.

ज्यांना खूप घाम येतो त्यांनी नियमितपणे केस धुवावेत. उन्हाळय़ात दिवसातून दोनदा डोक्यांवरून पाणी घेऊन डोक्यावरील घाम धुऊन टाकावा. या काळात केस सुकवण्यासाठी ड्रायर शक्यतो वापरू नये. कारण उष्ण हवामानामुळे केस तसेही लवकर सुकतात. आणखी ड्रायर वापरल्याने ते रूक्ष आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. निजण्याआधी खोबरेल तेलाने केसांना नियमित मसाज करणेही उन्हाळय़ासह एरवीही लाभदायक ठरते.