Uric Acid Control Tips: यूरिक ऍसिड हा आपल्या शरीरात तयार होणारा खराब पदार्थ आहे. जो शरीरातील प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने बनतो. किडनी आपल्या शरीरातून यूरिक ऍसिड फिल्टर करते, परंतु जेव्हा किडनी ते ऍसिड फिल्टर करू शकत नाही. तेव्हा हे ऍसिड रक्तात जाते. तर दुसरीकडे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे लठ्ठपणा, हाडांना सूज येणे, चालताना दुखणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय यूरिक अॅसिड वाढल्याने शरीराच्या अनेक भागात वेदना होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या कोणत्या भागात युरिक अॅसिड वाढल्यावर वेदना होतात.
यूरिक ऍसिड वाढल्याने शरीराच्या ‘या’ भागांमध्ये तीव्र वेदना होतात
गुडघेदुखी
युरिक अॅसिड वाढल्याने गुडघे लवकर दुखतात, ही तक्रार कायम राहते. कारण वाढलेल्या युरिक ऍसिडमुळे सांध्यांवर खूप ताण पडतो, गुडघ्यांमध्ये सूज किंवा लालसरपणाच्या तक्रारी असू शकतात, काही वेळा त्या व्यक्तीला चालणे देखील कठीण होते. तुम्हाला अशी कोणतीही तक्रार असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
घोट्याचे दुखणे
जेव्हा शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढू लागते तेव्हा ते हाडांमध्ये क्रिस्टल्सच्या रूपात जमा होऊ लागते. हे क्रिस्टल्स घोट्याच्या हाडांमध्ये जमा होऊ शकतात, जर तुमचाही घोटा दुखत असेल तर हे युरिक अॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.
पाठदुखी
पाठदुखी होत असेल आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर हे यूरिक अॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.
( हे ही वाचा: जड वस्तू उचलताना कधीही बेंबी सरकू शकते; ‘या’ ३ उपायांनी वेदनेपासून आराम मिळवा)
मानदुखी
जर एखाद्या व्यक्तीची मान दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण जर तुम्हाला मानेमध्ये तीव्र वेदना होत असतील तर ते युरिक अॅसिड वाढण्याचे लक्षणं असू शकतं.