यंदाच्या दिवाळीत दुर्मिळ योगायोग घडत आहे. ४ नोव्हेंबर रोजी एकाच राशीत ४ ग्रह बसले आहेत. सूर्य ग्रह, मंगळ ग्रह, बुध ग्रह आणि चंद्र ग्रह तूळ राशीत एकत्र असतील. अनेक राशीच्या लोकांना हे चार ग्रह एकत्र राहिल्याने फायदा होईल. पण मुख्यतः ही परिस्थिती ४ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील.


वृषभ राशी:

या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात देखील प्रगती होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक कार्यात रस घ्याल. जुनी कर्जे फेडता येतील.

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

कर्क राशी :

या राशीच्या लोकांसाठी या ग्रहांची ही स्थिती खूप शुभ ठरणार आहे. तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल. संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. प्रवासातून लाभ मिळण्याचीही स्थिती राहील. या काळात थांबलेली कामे पूर्ण होतील.

दिवाळीला लक्ष्मी-गणेशाची पूजा कशी करावी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि बीज मंत्र

तूळ राशी:

या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अतिशय शुभ असते. माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील. त्यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. उत्पन्न वाढू शकते.

धनु राशी :

या दिवाळीत या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असणार आहे. वाईट गोष्टी घडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. घर किंवा वाहन खरेदी शक्य आहे. तुम्हाला नवीन आणि चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.