scorecardresearch

‘या’ पदार्थांमुळे हाता- पायांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच खाणे थांबवा

हिवाळ्यात जास्त मिठाच्या सेवनाने शरीरातील सूज वाढते, त्यामुळे त्याचे सेवन कमी प्रमाणात करा.

‘या’ पदार्थांमुळे हाता- पायांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच खाणे थांबवा
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Inflammatory Diet: सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू आहे. याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. या ऋतूमध्ये सर्दी, खोकला, फ्लूच्या तक्रारी लोकांना खूप त्रास देतात. शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालावेत तसेच आहाराची काळजी घ्यावी. साखर, तळलेले पदार्थ आणि अल्कोहोल यासारख्या अनेक पदार्थांमुळे अनेक जुनाट आजारांमुळे सूज येऊ शकते.

जास्त थंडीमुळे हात-पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या वाढू लागते. हिवाळ्यात सूज फक्त हात, पाय आणि सांधे यांनाच येत नाही, तर चेहऱ्यावर आणि डोळ्यांवरही सूज येते. यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गाझियाबादचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. परमजीत सिंग यांनी सांगितले की, हिवाळ्यात हात, पाय आणि बोटे सुजणे याला चिलब्लेन्सची समस्या म्हणतात.

म्हणजे थंडीमुळे तुमच्या रक्तवाहिन्या फुगून हात पायांना सूज येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी, स्वतःला थंडीपासून वाचवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला जास्त थंडीमुळे सूज येण्याचा त्रास होत असेल तर आहारात काही पदार्थांचे सेवन टाळा. काही पदार्थांचे सेवन या समस्येत विषासारखे कार्य करते. नसा फुगल्याच्या वेळी कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेऊया तज्ञांकडून.

साखरेचे सेवन टाळा

हिवाळ्यात सूज येण्याची समस्या असल्यास आहारात साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा किंवा टाळा. तुम्ही फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारे फ्रक्टोज सेवन करू शकता. पण साखरेचे जास्त सेवन केल्याने तुमच्या शरीरात सूज निर्माण होण्याची समस्या वाढू शकते.

( हे ही वाचा: अंघोळ करतेवेळी ‘या’ चुका अजिबात करू नका; अन्यथा हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो)

अल्कोहोल टाळा

अल्कोहोलच्या अतिसेवनाने शरीरात सुजेचे प्रमाण वाढू शकते आणि आपल्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. अल्कोहोलचे सेवन केल्याने पूर्ण शरीरात सूज येऊ शकते.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

फ्राईज, चीज स्टिक्स, बर्गर आणि रोल यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. या सर्व पदार्थांमुळे शरीरात जास्त जळजळ होऊ शकते, त्यामुळे ते खाणे टाळा.

मीठ खाणे टाळा

मिठाच्या अतिसेवनामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो, तसेच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हिवाळ्यात मिठाचे जास्त सेवन केल्यास सूज येण्याची समस्या वाढू शकते, त्यामुळे आहारात मीठ टाळावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 20:23 IST

संबंधित बातम्या