Ayurvedic Treatment For Uric Acid : एकदा आपल्या शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा झाले की, अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकते. किंवा युरिक अ‍ॅसिड वाढल्याने मुतखडा, गाउट(एक प्रकारचा संधिवात) आणि आर्थरायटिस(सांध्यांमध्ये जळजळ, वेदना आणि कडकपणा येणे) सारख्या वेदनादायक समस्या उद्भवू शकतात, ज्या तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतात. म्हणून, युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक कपिल त्यागी यांनी युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे ते नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते.

  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी ३ गोष्टींचे सेवन करा
  • ओवा
  • अश्वगंधा
  • कडूलिंब

ओवा (carom seeds)

ओव्यात दाह विरोधी गुणधर्म असतात जे सूज कमी करतून संधिवाताचा त्रास कमी करता. त्याशिवाय ओव्यात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते जे युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित ठेवतो. तेच युरिक अ‍ॅसिड नैसर्गिक रित्या बाहेर पडण्यासाठी मदत करते. युरिक अ‍ॅसिडसाठी एक चमचा ओवा एक ग्लास पाणी उकळा आणि दिवसातून दोनदा हे पाणी प्या.

अश्वगंधा (Ashwaganda)

अश्वगंधा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात, अश्वगंधा एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते जी शरीरातील जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करते. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी देखील ती फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळा आणि दिवसातून एकदा प्या. यामुळे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळतील.

कडूलिंब ( Azadirachta indica, margosa, neem )

कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंब केवळ युरिक अ‍ॅसिडसाठीच फायदेशीर नाही तर ते अनेक आजारांवर देखील उपचार करते. कडुलिंबामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असतात, ज्यामुळे ते संधिवातावर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरते. प्रभावित भागात कडुलिंबाची पेस्ट लावल्याने वेदना आणि सूज कमी होते. यामुळे लक्षणीय आराम मिळेल.

अ‍ॅपल साईडर व्हिनेगर (Apple cider vinegar)

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यात असलेले मॅलिक अ‍ॅसिड युरिक अ‍ॅसिड विरघळण्यास मदत करते, ज्यामुळे ते शरीरातून बाहेर पडते. एका ग्लास कोमट पाण्यात १-२ चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पचनासाठी देखील चांगले आहे.

Ayurvadic remedies for uric acid
युरिक अ‍ॅसिडवर रामबाण उपाय! या ३ गोष्टी खा आणि सांध्यांत साचलेले खडे क्षणात होतील गायब

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय? (What is uric acid?)

खरं तर, आपण जे अन्न खातो त्यात प्युरिन नावाचे रसायन असते, जे युरिक अ‍ॅसिड तयार करते, जे लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. जेव्हा शरीरात प्युरिनचे चयापचय योग्यरित्या होत नाही, तेव्हा युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते. शरीरातून बाहेर पडण्याऐवजी, हे अ‍ॅसिड सांध्यामध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे वेदना, सूज आणि संधिवात सारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या आहाराबद्दल विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये प्युरिन आढळतात.