Ghee Benefits: तुम्हाला तूप खायला आवडते का? तुम्ही रोजच्या आहारात तूप घेता का? नसेल तर तुम्ही आजपासून तुमच्या आहाराता त्याचा सामावेश करू शकता. कारण भारतीय आहारात तुपाचे खूप महत्व आहे. आयुर्वेदामध्येही तुपाचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

तुप फक्त आरोग्यासाठी चांगले आहेच पण त्याचबरोबर ते जेवणाचा स्वाद देखील वाढवते. आपल्याकडे बहुतांश लोक डाळ-भातावर किंवा चपाती-पोळीवर तूप लावून खातात. हे चवीला उत्तम आहेच पण त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. तुम्हालाही तुपाचे फायदे मिळवायचे असतेल तर या पाच पदार्थांसह तुपाचे सेवन करू शकता.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

तुपासोबत हळद खावी

तूप मिसळून हळद खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. हे मिश्रण वजन कमी करण्यास, नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते. यासोबतच हे मिश्रण शरीरात होणारी जळजळ कमी करते.

मिश्रण कसे तयार करावे

हळदीच्या चवीचं तूप बनवण्यासाठी एका भांड्यात १ कप तूप टाका आणि त्यात १ टीस्पून हळद घाला. हे मिश्रण एअर टाईट बरणीत साठवा आणि वापरा.

( हे ही वाचा: मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय? तर जाणून घ्या यावर योग्य उपचार)

तुपासह तुळशीचे सेवन करा

तुळशीचे शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या पानांमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम देखील असतात. तज्ञ म्हणतात की तुळस रक्तातील साखर, लिपिड आणि रक्तदाब पातळी सामान्य करण्यास मदत करते . याशिवाय मानसिक ताणतणावातही मदत होते.

मिश्रण कसे तयार करावे

तुपासह तुळस वापरण्यासाठी तुप उकळताना त्यात तुळशीची पाने घाला. नंतर ते गाळून वापरण्यासाठी बरणीत ठेवा.

तुपामध्ये कापूर मिसळून वापरावे

तुपात कापूर मिसळण्याचे फायदे माहित नाहीत. कापूरला कडू-गोड चव असते आणि ती वात, पित्त आणि कफ या तीन दोषांना संतुलित ठेवते. हे पचनशक्ती वाढवते, आतड्यांतील जंतांवर उपचार करते, ताप टाळते आणि हृदय गती नियंत्रित करते. हे दम्याच्या रुग्णांना फायदा होण्यासाठी देखील कार्य करते.

(हे ही वाचा: Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक)

मिश्रण कसे तयार करावे

कापूर आणि तूप यांचे मिश्रण तयार करण्यासाठी तुपात खाण्यायोग्य कापूरचे १ ते २ तुकडे टाका आणि ५ मिनिटे गरम करा. आता तूप थंड होऊ द्या आणि नंतर हवाबंद बरणीत गाळून खाण्यासाठी ठेवा.

दालचिनीबरोबर तूप घ्या

दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यासोबतच दालचिनी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्यांपासूनही आराम देते. अशा वेळी तूप मिसळून खाल्ल्याने आरोग्याला चांगला फायदा होतो.

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल)

मिश्रण कसे तयार करावे

दालचिनी आणि तूप बनवण्यासाठी एका पातेल्यात तूप टाकून त्यात २ दालचिनीच्या काड्या टाका. मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे तूप गरम करा आणि नंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. जर तुम्ही घरी लोण्यापासून तूप बनवत असाल, तर लोणी उकळताना फक्त दालचिनीची काडी घाला आणि मिश्रण वापरण्यासाठी गाळून घ्या.

लसूण तुपासोबत खा

जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण आणि तूप यांचे मिश्रण जरूर वापरून पहा. लसूण एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असल्याचे म्हटले जाते , जे केवळ शरीरातील जळजळ कमी करू शकत नाही तर उच्च रक्तदाब देखील नियंत्रित करू शकते.

मिश्रण कसे तयार करावे

लसूण तूप बनवण्यासाठी एका पॅनमध्ये चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या सोबत थोडे तूप घाला. आच मंद ठेवा आणि ४-५ मिनिटे ढवळत राहा. तूप चांगले तापल्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून काही वेळ तवा ठेवा. काही वेळाने हे मिश्रण गाळून खाण्यासाठी ठेवावे.