ayurveda doctor advice consume ghee with turmeric tulsi camphor cinnamon garlic gives amazing benefits | Loksatta

तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही

Ghee Benefits: तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. म्हणून हे निरोगी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीसाठी फायदेशीर मानले जाते.

तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
फोटो(प्रातिनिधिक)

Ghee Benefits: तूप भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो. क्वचितच असे घर असेल जिथे तुप वापरले जात नाही. तूप फक्त चवीलाच उत्तम नाही तर त्याचा सुगंध जेवणाला अधिक अप्रतिम बनवतो. बहुतेक लोक याचा वापर डाळ, भाजी करण्यासाठी तसेच चपातीवर लावण्यासाठी करतात. तूप केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही देतो. पण जर तुम्हाला तुपाचे फायदे दुप्पट करायचे असतील तर येथे सांगितलेल्या ५ गोष्टींसह त्याचे सेवन सुरू करा.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ शरद कुलकर्णी सांगतात की, तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. हळद, कापूर, तुळस, दालचिनी यांसारख्या औषधी वनस्पतींसोबत तूप खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. फक्त एकदा किंवा दोनदा याचे सेवन करणे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे आहे.

( हे ही वाचा: मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्सचा त्रास सतावतोय? तर जाणून घ्या यावर योग्य उपचार)

तुपासोबत हळद खावी

तूप मिसळून हळद खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. हे मिश्रण वजन कमी करण्यास, नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते. यासोबतच हे मिश्रण शरीरात होणारी जळजळ कमी करते.

मिश्रण कसे तयार करावे

हळदीच्या चवीचं तूप बनवण्यासाठी एका भांड्यात १ कप तूप टाका आणि त्यात १ टीस्पून हळद घाला. हे मिश्रण एअर टाईट बरणीत साठवा आणि वापरा.

तुपासह तुळशीचे सेवन करा

तुळशीचे शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या पानांमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम देखील असतात. तज्ञ म्हणतात की तुळस रक्तातील साखर, लिपिड आणि रक्तदाब पातळी सामान्य करण्यास मदत करते . याशिवाय मानसिक ताणतणावातही मदत होते.

( हे ही वाचा: Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक)

मिश्रण कसे तयार करावे

तुपासह तुळस वापरण्यासाठी तुप उकळताना त्यात तुळशीची पाने घाला. नंतर ते गाळून वापरण्यासाठी बरणीत ठेवा.

तुपामध्ये कापूर मिसळून वापरावे

तुपात कापूर मिसळण्याचे फायदे माहित नाहीत. कापूरला कडू-गोड चव असते आणि ती वात, पित्त आणि कफ या तीन दोषांना संतुलित ठेवते. हे पचनशक्ती वाढवते, आतड्यांतील जंतांवर उपचार करते, ताप टाळते आणि हृदय गती नियंत्रित करते. हे दम्याच्या रुग्णांना फायदा होण्यासाठी देखील कार्य करते.

मिश्रण कसे तयार करावे

कापूर आणि तूप यांचे मिश्रण तयार करण्यासाठी तुपात खाण्यायोग्य कापूरचे १ ते २ तुकडे टाका आणि ५ मिनिटे गरम करा. आता तूप थंड होऊ द्या आणि नंतर हवाबंद बरणीत गाळून खाण्यासाठी ठेवा.

दालचिनीबरोबर तूप घ्या

दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यासोबतच दालचिनी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्यांपासूनही आराम देते. अशा वेळी तूप मिसळून खाल्ल्याने आरोग्याला चांगला फायदा होतो.

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल)

मिश्रण कसे तयार करावे

दालचिनी आणि तूप बनवण्यासाठी एका पातेल्यात तूप टाकून त्यात २ दालचिनीच्या काड्या टाका. मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे तूप गरम करा आणि नंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. जर तुम्ही घरी लोण्यापासून तूप बनवत असाल, तर लोणी उकळताना फक्त दालचिनीची काडी घाला आणि मिश्रण वापरण्यासाठी गाळून घ्या.

लसूण तुपासोबत खा

जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण आणि तूप यांचे मिश्रण जरूर वापरून पहा. लसूण एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असल्याचे म्हटले जाते , जे केवळ शरीरातील जळजळ कमी करू शकत नाही तर उच्च रक्तदाब देखील नियंत्रित करू शकते.

मिश्रण कसे तयार करावे

लसूण तूप बनवण्यासाठी एका पॅनमध्ये चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या सोबत थोडे तूप घाला. आच मंद ठेवा आणि ४-५ मिनिटे ढवळत राहा. तूप चांगले तापल्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण ठेवून काही वेळ तवा ठेवा. काही वेळाने हे मिश्रण गाळून खाण्यासाठी ठेवावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-10-2022 at 11:31 IST
Next Story
घर आणि करियर: वर्क और लाइफ, दोनो के साथ जिन्दगी बॅलन्स हो सकती है|