scorecardresearch

Benefits of Roasted Gram: भाजलेले चणे खाल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते; तज्ञांनी सांगितलेले त्याचे ७ मोठे फायदे जाणून घ्या

Benefits of Roasted Gram: भाजलेले चणे खायला अनेकांना आवडतात. भारतातील जवळपास प्रत्येक घरात त्यांचा वापर होतो. पोषक तत्वांनी भरपूर भाजलेले हरभरे खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि चांगली ऊर्जाही मिळते. चला जाणून घेऊया तज्ञांनी सांगितलेले त्याचे ७ मोठे फायदे.

Benefits of Roasted Gram: भाजलेले चणे खाल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते; तज्ञांनी सांगितलेले त्याचे ७ मोठे फायदे जाणून घ्या
फोटो(प्रातिनिधिक)

Benefits of Roasted Gram: भाजलेले चणे भारतात खूप खाल्ले जातात. अनेकांना भाजलेले चणे खायला फार आवडतात. हे अनेक पदार्थांमध्ये देखील वापरले जाते. चणे मंद आचेवर भाजल्याने ते कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम बनतात. भाजलेल्या चणे अनेक पोषक तत्त्वांनी संपूर्ण आहेत. ते प्रथिने, फायबर, फोलेट, खनिजे आणि फॅटी ऍसिडचा खूप चांगला स्रोत आहे. भाजलेल्या चण्यामध्ये चरबी नसते आणि ते उर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे. ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते.

तज्ज्ञांच्या मते, चणे भाजल्याने त्यातील पोषकतत्त्वे देखील वाढते. चला जाणून घेऊया नियमित भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

प्रथिने मुबलक प्रमाणात असतात

चणे हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे. ते भाजल्याने त्यातील पोषक तत्वांवर अजिबात परिणाम होत नाही. शरीरातील नवीन पेशी दुरुस्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात, ज्यामुळे वाढीस चालना मिळते.

( हे ही वाचा: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ पिठाच्या पोळीचे सेवन करा; तज्ञांकडून जाणून घ्या पिठाच्या प्रमाणाची योग्य मात्रा)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय

कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) पदार्थ सर्व मधुमेहींसाठी चांगले असतात. जीआय कमी असणे म्हणजे ते अन्न खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीत कोणताही चढ-उतार होत नाही. चण्याची जीआय पातळी २८ असल्याने मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला आहार पर्याय आहे.

कोलेस्ट्रॉल कमी करते

फायबर युक्त भाजलेल्या चण्याच्या नियमित सेवनाने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात वाढत गेले की अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा देखील धोका असतो.

( हे ही वाचा: टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का? जाणून घ्या तज्ञांकडून)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

भाजलेले चणे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे. एका अभ्यासानुसार, फायबर युक्त फळे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळेच तुम्ही चुकीच्या गोष्टी खाण्यापासून वाचता. याशिवाय फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

मजबूत हाडे

भाजलेले हरभरे हाडे निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करतात. एका अभ्यासानुसार, भाजलेल्या चण्यांमध्ये असलेले मॅंगनीज आणि फॉस्फरस आपल्या हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. तसंच सांधेदुखी इत्यादीसारख्या परिस्थितींना दूर ठेवता येते.

( हे ही वाचा: तुपासोबत ‘या’ ५ गोष्टी एकत्र केल्यास बनतात अमृतसमान; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही)

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त

मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस आणि तांबे यांनी समृद्ध भाजलेले चणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेले फॉस्फरस विशेषतः आपले रक्त संचारण सुधारण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओळखले जाते.

रक्तदाब नियंत्रित करते

चणे हे प्रथिने आणि फायबर तसेच चरबी आणि कॅलरीजचे कमी स्त्रोत आहे. भाजलेल्या चण्यामध्ये तांबे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम असते. तांबे आणि मॅग्नेशियम सूज कमी करतात आणि रक्तवाहिन्यांना आराम देतात. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. भाजलेल्या चण्यांमध्ये फॉस्फरस असतो, जो रक्तदाब नियंत्रित करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या