Ayurvedic Diabetic tips: आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी मेडिकलमध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने मधुमेह कंट्रोल करू शकता. आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत, ज्यामुळे कोणताही दुष्परिणाम न होता शरीरातील साखर कंट्रोलमध्ये राहते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी खालील काही घरगुती उपाय करून पाहा.

  • आवळा चूर्ण
    आवळा हा शक्तीशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण आवळ्यात अधिक आहे. आवळा देखील क्रोमियमने समृद्ध आहे. हे खनिज चयापचय सुधारते. क्रोमियम रक्तातील साखर नियंत्रणात ठेवताना तुमच्या शरीरातील इन्सुलिन क्षमता सुधारते. आवळ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह देखील असते. ते शरीराला इंसुलिन शोषण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. आवळा सुकवून पावडर बनवून रोज सकाळी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.
  • ​दालचिनी चूर्ण
    दालचिनी एक नैसर्गिक बायोऍक्टिव मसाला आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतात. याचं सेवन करणे सोपे आहे. एक ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घ्या. चांगल मिश्रण मिक्स करून घ्या आणि हळू हळू प्या. दिवसातून दोन वेळा याचं प्राशन करू शकता.

आणखी वाचा : Winter Tips: हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून ते पचनापर्यंत ‘हा’ चहा ठेवेल तुम्हाला फिट, आरोग्यदायी फायदे जरूर वाचा!

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
  • मेथीचे चूर्ण
    मेथी दाणे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. रात्री दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी बिया टाकून प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. ते बारीक करून पावडर बनवून सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास फायदा होईल. मेथीचे दाणे बारीक करून पावडर म्हणून वापरता येतात.
  • त्रिफळ
    त्रिफळा हे चूर्ण फॉर्म्युला आहे ज्यामध्ये हरितकी, आवळा आणि बिभिटकी असते. बद्धकोष्ठतेपासून मुक्तता आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याव्यतिरिक्त, ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून देखील कार्य करते. हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत असल्याने, ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकते.
  • हरड बहेरा चूर्ण
    बहेरा आणि हरड हे दोन्ही किराणा दुकान आणि आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. हे दोन्ही एकत्र करून त्यांची पावडर बनवावी. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणूनही काम करते. हे अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते.